Header Ads

Header ADS

नववीतील विद्यार्थिनीची शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

9th-student-suicide-tired-of-teacher-suffering


नववीतील विद्यार्थिनीची शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून  आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : इंग्रजी शाळेतील शिक्षकाने सतत संदेश पाठवून प्रेमसंबंधाच्या जाळ्यात आेढण्यासाठी दिलेल्या त्रासाला कंटाळून नववीतील १५ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची तक्रार दौलताबाद पोलीस ठाण्यात गुरुवारी दाखल करण्यात आली आहे. त्यावरून शिक्षक अजय जयवंत सासवडे (वय ३५) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. दौलताबाद पोलिसांनी शिक्षक अजय सासवडे याला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली.

    माळीवाडा येथील १५ वर्षीय विद्यार्थिनी गंगापूर तालुक्यातील आसेगाव येथील एका इंग्रजी शाळेत नववीच्या वर्गात शिकत होती. मात्र, शिक्षक अजय सासवडे याने १४ जानेवारी ते १७ मे पर्यंत मोबाईल फोनवर संदेश पाठवून प्रेमाच्या जाळ्यात आेढण्याचा प्रयत्न केला. भेटण्याचा आग्रह केला. त्याला कंटाळून विद्यार्थिनीने १७ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.