Header Ads

Header ADS

सावदा शहरात उत्स्फूर्त प्रतिसादाने 65 टक्के मतदान शहरातील प्रत्येक प्रभागाची आकडेवारी वाचा

 

सावदा शहरात उत्स्फूर्त प्रतिसादाने 65 टक्के मतदान शहरातील प्रत्येक प्रभागाची आकडेवारी वाचा

सावदा शहरात उत्स्फूर्त प्रतिसादाने 65 टक्के मतदान शहरातील प्रत्येक प्रभागाची आकडेवारी वाचा

 लेवा जगत न्यूज सावदा -रावेर लोकसभा मतदारसंघाच्या 2024 च्या निवडणुकीसाठी आज चौथ्या टप्प्यात मतदान झाले. सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 23 बूथ वर  झालेल्या मतदानात 65 टक्के मतदान शहरात झाले.

    जळगाव जिल्ह्यात आज भारताच्या लोकशाहीच्या महाउत्सवाच्या निमित्त लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीत रावेर मतदार संघासाठी आज मतदान झाले शहराच्या 23 बूथ वरती मतदान ना साठी एकूण 19,059 मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी 12470 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.परसेंटेज 65.48% आहे .

      शहरात सकाळी पावसामुळे थंड वातावरण असल्याने सकाळी सात वाजेपासूनच मोठ्या संख्येने मतदानासाठी महिला व पुरुष व तरुण तरुणींनी रांग लावली होती या रांगेत जवळजवळ शंभर ते 200 मतदार प्रत्येक बुथवरती उपस्थित होते. एक वाजेपर्यंत ही परिस्थिती अशीच होती. त्यानंतर सूर्याचा वातावरण तप्त झाल्याने तुरळक तुरळक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत होते. शहरात बूथ नंबर 12 वरती 1431 मतदारांपैकी 887 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला बूथ नंबर तेरा वरती 669 पैकी 430 बूथ नंबर 14 वरती 832 पैकी 571 बूथ नंबर 15 वरती 865 पैकी 626 बूथ नंबर 16 वरती 1061 पैकी 642 बूथ नंबर 17 वरती 887 पैकी सहाशे तेवीस बूथ नंबर 18 वरती 918 पैकी 666 बूथ नंबर 19 भरती 955 पैकी643 बूथ नंबर वीस वरती 477 पैकी 316 बूथ नंबर 21 वरती 759 पैकी 482 बूथ नंबर 22 वरती 501 पैकी 316 बुथ नंबर 23 वरती 1046 पैकी 698 बूथ नंबर 24 वरती 672 पैकी 468 बूथ नंबर 25 वरती 912 पैकी 528 बूथ नंबर 26 वरती 646 पैकी 420 बूथ नंबर 27 वरती 940 पैकी 601 बूथ नंबर 28 वरती तेराशे सात पैकी 811 बूथ नंबर 29 वर 914 नंबर 557 बूथ 30 वरती 749 पैकी 481 बूथ नंबर 31 वरती 614 पैकी 450 बूथ नंबर 32 वरती 659 पैकी 451 बूथ नंबर 33 वरती 560 पैकी 400 बूथ नंबर 34 वरती 710 पैकी 468 असे एकूण 19 हजार 59 मतदारांपैकी 12,470 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला शहरातील या मतदानाची टक्केवारी 65.48% अशी झाली. मतदानादरम्यान उमेदवारांनी बूथला भेटी दिल्या व जिल्हा पोलीस प्रमुख,तहसिलदार, विभागीय अधिकारी यांनीही भेट दिली .तसेच इतर अधिकाऱ्यांनीही यावेळी भेटी दिल्या मतदान उस्फुर्तपणे उत्साहात शांततेत पार पडले. या कामी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह पोलिस कर्मचारी, होमगार्ड,सीआरपीएफ जवान यांनी चोख बंदोबस्त ठेवला. तसेच मतदानात  काही अडचण आल्यास सावदा तलाठी कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रवीण वानखेडे, तलाठी  रशीद तडवी व मुख्याधिकारी भूषण वर्मा जितेश पाटील यांनी मतदारांना मदत केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.