Header Ads

Header ADS

३ मे रोजी संपन्न होणाऱ्या विवाह सोहळ्यात बडेजाव आणि अवांतर खर्चाला फाटा देत गुर्जर समाज मंडळाला भरीव मदत

3-May-to-be-done-on-the-wedding-ceremony-Badejav-and-for-the-extra-expenses-to-give-substantial-help-to-the-Gurjar-Society-Mandala


३ मे रोजी संपन्न होणाऱ्या विवाह सोहळ्यात बडेजाव आणि अवांतर खर्चाला फाटा देत गुर्जर समाज मंडळाला भरीव मदत

पाचोरा (गुरुदत्त वाकदेकर) : विवाह सोहळ्याच्या आधी आणि नंतरही होणार्‍या विविध कार्यक्रमांमध्ये पैशांची उधळपट्टी करत आपल्या श्रीमंतचे प्रदर्शन करण्याची मनोवृत्ती अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत होतांना दिसत आहे. या संदर्भात अनेक साधकबाधक चर्चा प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या तरी त्यात कोणतीही सुधारणा अथवा बदल होतांना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत लेवा गुर्जर समाजातर्फे अनेक अनिष्ठ रूढी परंपरांसोबतच नावीन्यपूर्ण चुकीच्या उपक्रमांचा शिरकाव झाल्याने यावर प्रतिबंध व्हावा यासाठी ठिकठिकाणी बैठका घेऊन निर्णय घेण्यात आला. अर्थात आजपर्यंत जवळ-जवळ सर्वच समाजामधील अनुभव असा आहे की, ठराव निर्णय होतात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही किंवा काही कठोर निर्णय घेण्यासाठी सहसा कोणी हिंमत करत नाही. परंतु पाचोरा येथील स्वातंत्र्य सैनिक पुत्र संदीप दामोदर महाजन आणि त्यांच्या अर्धांगिणी उपशिक्षिका शितल संदीप महाजन यांनी सर्व समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आपली उच्चशिक्षित कन्या प्रा. डॉ. वैष्णवी संदीप महाजन आणि चि. अनंत सुदाम पाटील यांच्या दिनांक ३ मे रोजी संपन्न होणार्‍या विवाह सोहळ्यात आर्थिक परिस्थितीने सक्षम असतांना देखील आपण समाजाचे देणे लागतो या उद्दात्त भावनेने निमंत्रणासाठी समाज माध्यमांचा वापर करून विशेषत: कोणालाही व्यक्तीश: फोन न करता संदेशांद्वारे निमंत्रण दिले. तर प्री-वेडींग शुटींग, बँड, डीजे, ऑर्केस्ट्रा, घोडा, बग्गी, पत्रिका छपाई इत्यादींवर होणारा वाटपाचा खर्च, व्यक्तीगत जाऊन मुळ लावणे, जानोसा अक्षदांच्या नावे (तांदूळ) ची नासाडी अशा सर्व चुकीच्या रूढी परंपरांना फाटा देत कोणताही बडेजाव न करता विवाह सोहळ्यातील अवांतर खर्चाला फाटा देवून मुंबई येथे होणार्‍या समाज मंदिराच्या उभारणीसाठी १,११,१११ रूपयांची भरीव देणगी संदीप महाजन यांनी दिली. त्यांच्या या औदार्याला त्यांच्या अर्धांगिणी पाचोरा येथील श्री गो.से. हायस्कूल मधील उपशिक्षिका शितल संदीप महाजन यांनी देखिल आपल्या पगारातून स्वतःच्या वडीलांच्या नावे ३१,००० रूपयांची भरीव मदत देवून माहेर आणि समाजाप्रती असलेली निष्ठा, आपुलकी स्पष्ट करून एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे. 

पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील मुळ रहिवाशी नगरपालिकेत ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर म्हणून सेवा बजावलेल्या आणि वर्ग ८ वीत असतांना बालवयातच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीश विरोधी कारवाया केल्याने सहा महिन्यांचा येरवडा तुरूंगात शिक्षा भोगलेल्या कै. आण्णासाो. दामोदर लोटन महाजन यांचे सुपुत्र, ध्येय करिअर अ‍ॅकडमीचे संचालक तथा पत्रकार संदीप महाजन यांची जेष्ठ कन्या प्रा. डॉ. वैष्णवी संदीप महाजन यांचा विवाह परधाडे येथील मुळ रहिवाशी आणि सध्या जळगाव येथे वास्तव्यास असलेले राहुरी कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ, मुक्ताईनगर कृषी कॉलेजचे माजी प्राचार्य, भारत सरकारच्या वतीने सन्मानीत होऊन इंग्लंड आणि कॅनडा दौर्‍यासाठी नियुक्ती झालेले डॉ. सुदाम चिंधु पाटील यांचे एम. टेक. इलेक्ट्रीकल अशी उच्चशैक्षणिक पात्रता असलेले सुपुत्र अनंत सुदाम पाटील यांच्याशी निश्चित झाला. विवाहाची बोलणी चालू असतांना संदीप आणि शितल महाजन यांनी विवाह सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मेहेंदी, हळद, संगीत, वैदिक विवाह, विवाह सोहळा असे उपक्रम उत्साहपूर्ण साजरे करणार असले तरी वरील अवांतर खर्च आणि बडेजाव यांना फाटा देऊन खारघर येथील गुर्जर समाजाच्या नियोजीत समाज मंदिराच्या उभारणीसाठी भरीव मदत देण्याचा विषय मांडला त्या विषयास डॉ. सुदाम आणि त्यांचे सुपुत्र अनंत पाटील यांच्यासह सर्व कुटूंबियांनी मान्यता दिली. गुर्जर समाजातील आदर्श असा विवाह दिनांक ३ मे रोजी संपन्न होणार आहे. योगायोग म्हणजे वधु स्वातंत्र्य सैनिक यांची नात तर वर सध्या भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल पदावर सेवेत असलेले चारूदत्त सुदाम पाटील यांचे लहान बंधू आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.