झाडांच्या फांद्या तोडत असतांना विद्यूत तारांना धक्का लागल्याने तरूणाचा जागीच मृत्यू
झाडांच्या फांद्या तोडत असतांना विद्यूत तारांना धक्का लागल्याने तरूणाचा जागीच मृत्यू
लेवाजगत न्यूज साकेगाव-साकेगाव ते भानखेडा रस्त्यावरील झाडांच्या फांद्या तोडत असतांना विद्यूत तारांना धक्का लागल्याने साकेगाव येथील ३६ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किशोर पंढरीनाथ कोळी वय ३६ रा. साकेगाव ता. भुसावळ असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे किशोर कोळी हा तरूण आपल्या पत्नी कल्पना आणि आई जनाबाई यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शेतातील मूजरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी १६ एप्रिल रोजी किशोर हा साकेगाव ते भानखेडा रस्त्यावरील शेतातील बांधावर असलेल्या झाडाच्या फांद्या तोडत होता. त्यावेळी झाडाजवळून गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्यूत तारांचा स्पर्श झाल्याचे विजेचा जोरदार धक्का बसला व तो झाडावरून खाली पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैदृयकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई जनाबाई, पत्नी कल्पनाबाई आणि विवाहित दोन बहिणी असा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत