Header Ads

Header ADS

उद्या भुसावळ येथे मरीमातेच्या बारा गाड्या व यात्रोत्सव


 उद्या भुसावळ येथे मरीमातेच्या बारा गाड्या व यात्रोत्सव 

लेवाजगत न्युज भुसावळ : शहरातील जुना सतारे भागातील जगतजननी मरिमाता मंदिराच्या बारागाड्या व यात्रोत्सव मंगळवार, 9 एप्रिल रोजी होत आहे. यंदा समितीने बारागाड्या ओढल्या जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूंनी बॅरिकेटींग करण्याचे नियोजन केले आहे. यासोबत तब्बल 550 स्वयंसेवकांसाठी टी शर्ट वाटप केले आहेत. बारागाड्यांवरही निर्धारित करुन दिलेले भाविकच बसतील. त्यांनाही ओळखीसाठी टी शर्ट देण्यात येईल. टवाळखोर, दारुड्या तसेच गाड्यांवर बसणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.(Bhusawal)

दुर्घटना टाळण्यासाठी व्यापक नियोजन


जगतजननी मरिमाता मंदिराच्या यात्रोत्सवातील बारागाड्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपूर्वी दुर्घटनेत एकाचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासून समितीने व्यापक नियोजन केले आहे. यंदा जळगाव रोडवर बारागाड्या ओढल्या जातील त्या मार्गावर दुभाजक व रस्त्याच्या बाजूला दोन्ही ठिकाणी बॅरिकेटींग केले जाणार आहे. बारागाड्यांवर बसणारे भाविक तसेच बॅरिकेटींगच्या आतील 550 स्वयंसेवकांना टी शर्ट दिले जाणार आहेत.(bhusawalyatra)

 या व्यतिरिक्त कुणी बारागाड्यांवर बसेल त्यास पोलीस मज्जाव करतील, यासोबतच यात्रोत्सवातील टारगट, दारुड्यांवर अधिक लक्ष केंद्रीत केले जाईल, अशा सूचना दिल्या. समितीचे अध्यक्ष देवेंद्र सपकाळे, उपाध्यक्ष दुर्गेश कोळी, मंजीत कोळी, सचिव श्रेयस इंगळे, कार्याध्यक्ष राहुल सोनवणे आदी सहकार्य करीत आहे.(baragade)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.