Header Ads

Header ADS

धावत्या रेल्वे समोर येवून अपंग तरूणाची आत्महत्या

 


धावत्या रेल्वे समोर येवून अपंग तरूणाची आत्महत्या

लेवाजगत न्यूज जळगाव -तालुक्यातील वडनगरी येथील २६ वर्षीय दिव्यांग तरूणाने धावत्या रेल्वेसमोर येवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास शहरातील समृध्दी अपार्टमेंट समोर घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. भगवान माणिलाल चौधरी वय २६ रा. वडनगरी, ता. जळगाव असे मयत झालेल्या दिव्यांग तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे भगवान चौधरी हा तरूण आपल्या आईवडील आणि भाऊ सोबत वास्तव्याला होता. तो दोन्ही पायांनी अपंग होता. टेन्ट हाऊस चालवून तेा आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, शनिवारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता तो कामानिमित्ता जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. रविवारी ७ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता शहरातील समृध्दी अपार्टमेंटसमोरील रेल्वे रूळावर धावत्या रेल्वे समोर उभा राहून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. सोबत असलेल्या कागदपत्राच्या आधारे त्यांची ओळख पटली. शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई निर्जला, वडील माणिलाल गंभीर चौधरी आणि लहान भाऊ पवन असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद सोनार हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.