कळंबुसरे येथील स्वयंभू श्री इंद्रायणी एकविरा देवी यात्रा व पालखी सोहळा चे आयोजन
कळंबुसरे येथील स्वयंभू श्री इंद्रायणी एकविरा देवी यात्रा व पालखी सोहळा चे आयोजन
उरण (लेवाजगत न्यूज सुनिल ठाकूर )रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील स्वयंभू श्री इंद्रायणी एकविरा देवी यात्रा व पालखी सोहळा सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ ते मंगळवार दिनांक १६ एप्रिल २०२४ या दरम्यान श्री इंद्रायणी एकविरा माता ट्रस्ट,कळंबुसरे ग्रामस्थ, मित्र मंडळ कडून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. कळंबूसरे येथील स्वयंभू इंद्रायणी एकविरा हे पांडवकालीन स्वयंभू स्थान आहे. प्राचीन काळी पाच पांडव वनवास करत असताना या इंद्रायणी कळंबुसरे डोंगरावर वास्तव्यास होते. तसेच कार्ल्याची एकविरा देवी पण या ठिकाणी वास्तव्यास होती.एका दिवसात माझे देऊळ या ठिकाणी बांधा मी येथे वास्तव्यास राहीन असा आदेश एकविरा देवीने पाच पांडवांना दिला. पण एका दिवसात या ठिकाणी देऊळ बांधता आले नाही. देवीने देऊळ व इतर परिसर उध्वस्त केले. देवळाचे काही अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात. या नंतर देवी कार्ला येथे स्थायिक झाली. देवीचे आज ही येथे वास्तव्य आहे.तसेच देवी नवसाला पावणारी, मनातील ईच्छा पूर्ण करणारी म्हणून प्रचलित आहे. येथे चैत्र उत्सव व नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसेच पावसाळ्यात या ठिकाणी निसर्ग रम्य वातावरण आपणास पाहायला मिळते .वर्षा सहलीसाठी हे ठिकाण खुप चांगले आहे. इंद्रायणी एकविरा देवी मंदिर कळंबुसरे या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी असे हे निसर्गरम्य ठिकाण आहे. इंद्रायणी एकविरा माता ट्रस्ट कळंबुसरे उरण यांच्या मार्फत व ग्रामस्थांमार्फत येथे विविध सण उत्सव साजरे केले जातात.
रविवार दिनांक १४एप्रिल २०२४ इंद्रायणी एकविरा देवी यात्रा आरंभ. सोमवार दिनांक१५/४/२०२४ इंद्रायणी एकविरा देवी यात्रा व पालखी मंगळवार दिनांक १६/४/२०२४रोजी देवीचा वैद्य सोहळा तरी सर्व एकविरा भक्तांनी दर्शनाचा व पालखी सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन -इंद्रायणी एकविरा माता ट्रस्ट कळंबुसरे - उरण व सुरेंद्र राऊत व सुशिल राऊत मित्र परिवर कळंबुसरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत