Header Ads

Header ADS

अल्पवयीन मुलाचा चाळीसगाव नगरपालिकेच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू

 

अल्पवयीन मुलाचा चाळीसगाव नगरपालिकेच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू


लेवाजगत न्युज चाळीसगाव:- चिंचखेडा येथील एका अल्पवयीन मुलाचा चाळीसगाव नगरपालिकेच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला.

चाळीसगाव नगरपरिषदेच्या जलतरण तलावात बुडाल्याने चिंचखेडा, ता. चाळीसगाव येथील 15 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू ओढवला. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. अमन मनोहर निकम (15, चिंचखेडा, ता. चाळीसगाव) असे मयताचे नाव आहे.

झटके आल्यानंतर तलावात मुलाचा मृत्यू


आगीत सावदा येथे दोन दुकाने जळून खाक,वेळीच अग्निशामक दलाचे कर्मचारी आल्याने पुढील अनर्थ टळला

https://youtu.be/YFsnlyvvWQ0


जलतरण तलावाचे व्यवस्थापक महेंद्र प्रल्हाद चौधरी (48, चाळीसगाव) यांनी चाळीसगाव शहर पोलिसात दिलेल्या खबरीनुसार, सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांच्यासह गार्ड मधुकर चौधरी, शाम जाधव व सागर जाधव हे हजर असताना साडेतीन वाजेच्या सुमारास अमन निकम (15, चिंचखेडा) आला व त्याने स्विमिंग पुलात उडी घेतली मात्र काही वेळातच पाण्यात मुलाला झटके येत असल्याचे गार्ड मधुकर चौधरी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आवाज दिल्याने सर्व गार्ड यांनी मुलाला बाहेर काढत डॉ. राहुल वाघ यांच्या रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.