Header Ads

Header ADS

सावदा येथील युवकाचा गारबर्डी धरणात बुडून मृत्यू रमजान ईद च्या दिवशी परिसरावर शोककळा

 

Mourning in the area on the day of Ramadan-Eid-of-a-young-man-in-Garbardi-dam-by-drowning-in-Sawada

सावदा येथील युवकाचा गारबर्डी धरणात बुडून मृत्यू     

रमजान ईद च्या दिवशी परिसरावर शोककळा 

लेवा जगत न्यूज सावदा -इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या सावदा येथील ख्वाजा नगर भागातील शेख तबरेज शेख रमजान मोमीन (वय वर्ष १५ )याचा रावेर तालुक्यातील गारबर्डी धरणात बुडून मृत्यू झाला. रमजान महिन्यात तबरेज ने ३०रोजे पूर्ण केले व हाफिज जे कुराण ही पदवी देण्यात आली होती. रमजान ईदच्या दिवशी ही दुर्घटना घडल्याने परिसरात शोककडा पसरली.

हा व्हिडीओ बघा-रमजान ईदला हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा सावदा येथे सण उत्साहात साजरा

https://youtu.be/cEH8gCnwuSg

     शेख तबरेज शेख रमजान मोमीन हा आपल्या चार ते पाच मित्रासोबत गुरुवारी सकाळच्या ईदगाह वरील सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर गारबर्डी धरणावर फिरायला गेला. तेथे पाय घसरून पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

 एकीकडे रमजानचा उत्साह असताना शेख ताबिशच्या मृत्यूच्या बातमीने ख्वाजा नगरात धक्का बसला. त्याच्या पश्चात एक मोठा भाऊ एक लहान भाऊ असा परिवार आहे. मृत तरुण विद्यार्थी हा दहावीच्या वर्गात होता.तरुणास  होती.बुडन मोमीन यांचे नातू होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.