Header Ads

Header ADS

आई एकवीरा देवीने दिला ॲड. चेतन पाटील यांच्या बाजूने कौल श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे त्वरित इलेक्शन घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे निर्देश

Mother-Ekvira-Devi-Dila-ad-Chetan-Patil-on-side-Sri-Ekvira-Devasthan-Trust-Supreme-Court-directed-to-hold-quick-election-


आई एकवीरा देवीने दिला ॲड. चेतन पाटील यांच्या बाजूने कौल श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे त्वरित इलेक्शन घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे निर्देश

उरण (सुनिल ठाकूर )पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री एकवीरा देवी देवस्थान ट्रस्टवर देवीच्या भक्तांमधून दोन सदस्य निवडण्याकरता घेण्यात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवनाथ देशमुख, मारुती देशमुख, संजय गोविलकर व इतर यांनी नवी मुंबई येथील देवीचे भक्त ॲड. चेतन रमेशदादा पाटील यांचे विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका कोर्टाने डिसमिस करून त्वरित निवडणूक घेण्याचे निर्देश आज दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी दिले आहेत.

कार्ला येथील श्री एकवीरा देवी ही कोळी, आगरी, भंडारी, भोई, वैती, मांगेला या समाजाची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टवर सात सदस्यांची निवड करण्यात आली असून या सात सदस्यांनी देवीच्या भक्तांमधून दोन सदस्य निवडण्याकरता उमेदवारी अर्ज मागविले होते परंतु मुंबई उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने या अगोदर आदेश दिलेले असताना देखील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवनाथ देशमुख, मारुती देशमुख, संजय गोविलकर व इतर यांनी ॲड. चेतन रमेशदादा पाटील यांचे विरोधात कोळी, आगरी, भंडारी, भोई, वैती, मांगेला व एकवीरा देवीच्या भक्तांवर अन्याय करण्यासाठी सुप्रीम कोर्ट येथे एसएलपी (SLP) क्रमांक 18709/2023 मध्ये इंट्रीम एप्लीकेशन (IA) नं.74408/2024 व 74409/2024 च्या माध्यमातून पुन्हा एकदा याचिका दाखल केली होती परंतु श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट वतीने नवनाथ देशमुख व इतर यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने डिसमिस करून टाकून त्वरित इलेक्शन घेण्याकरता निर्देश दिले आहेत.

याबाबत माहिती देताना ॲड. चेतन पाटील यांनी देवीच्या भक्तांमधून दोन सदस्य निवडण्याकरिता काही स्थानिक व्यक्तींचा विरोध असल्याने ते वारंवार याचिका दाखल करत आहेत परंतु आई एकवीरा देवीने तिच्या प्रामाणिक, सच्चा आणि निष्ठावंत भक्तांच्या बाजूने कौल दिला असल्याच्या भावना व्यक्त केल्या. 

तसेच कोळी, आगरी, भोई, वैती, मांगेला व देवीच्या भक्तांविरोधात कट कारस्थान करणाऱ्यांना वेळोवेळी आम्ही मुंबई उच्च न्यायालय असू दे किंवा सर्वोच्च न्यायालय आसू दे त्यांना तिन्ही वेळा हरवलेले आहे. त्यांना त्यांची जागा ही आई माऊलीने दाखवली असल्याने हा सर्व एकविरा आईच्या भक्तांचा विजय असल्याचे सांगून सर्व समाजाने व देवीच्या भक्तांनी अशा प्रवृत्तींन विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.