Header Ads

Header ADS

मोहराळा गावातील मंदिरावर पाणी मारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तोल गेल्याने खाली पडून गंभीर जखमी




 मोहराळा गावातील मंदिरावर पाणी मारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तोल गेल्याने खाली पडून गंभीर जखमी

लेवाजगत न्युज यावल:- यावल तालुक्यातील मोहराळा गावात मंदिरावर पाणी मारतांना तोल जाऊन पडल्याने गावातील एक तरूण दुखापत होऊन गंभीररित्या जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी साकेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.


या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, वैभव राजेंद्र पाटील हा शेतकरी (वय- २७ वर्ष, रा. मोहराळा) हा दि. ७ एप्रिल रविवार रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजेच्या सुमारास गावात बांधण्यात येत असलेल्या श्री विठ्ठल मंदिराच्या बांधकामावर पाणी मारत असतांना अचानक त्याचा तोल जाऊन २० फुट उंचीवरून खाली कोसळला त्यामुळे खाली कोसळ्याने डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने वैभव पाटील यास माजी पंचायत समिती सदस्य शेखर पाटील व गावातील नागरिकांच्या मदतीने त्यास तात्काळ उपचारासाठी साकेगाव येथील गोदावरी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. 

वैभव पाटील अल्पभूधारक शेतकरी असुन तो कुटुंबात वडील नसल्याने तो एकुलता एक मुलगा असल्याने आपल्या आई बरोबर मोहराळा येथे राहात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.