पत्रकार कमलाकर माळी यांनी केला अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा
पत्रकार कमलाकर माळी यांनी केला अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा
वाघोदा (प्रतिनिधी) : सध्या समाजात वाढदिवस म्हटला की समोर येतो फँन्सी केक. तो ही महाग पण केक न कापता त्याच पैशाची फळे आणुन वाटप करून वाढदिवस साजरा करा असे आवाहन माणुसकी समूहातर्फे पत्रकार कमलाकर माळी यांनी केले आहे. तसा स्वता! ही साजरा केला दरवर्षी ते विविध उपक्रम राबवितात गावात त्यांनी दोन वर्ष अगोदर ग्रामस्थांसाठी स्वखर्चाने वाचन कट्टा वाचनालय सुरु केले आहे.तसेच हा वाढदिवस त्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला.हा वाढदिवस डांगर टरबुज फळे काटुन वाटुन साजरा केला.असा शेतकरी हिताचा संदेश या वाढदिवसाच्या निमित्ताने दिला केक कापण्याचा सध्याचा ट्रेंड पाहता केक लहान मुलांपासून ते १०० वर्षांच्या आजोबांपर्यंत आबालवृद्धांची वाढदिवस थाटात साजरा करण्याची सध्या फॅशन चालू आहे गल्लीबोळात सारी पोरही आपल्या मित्राच्या वाढदिवशी केक कापून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत असतात. सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या व्यक्तींचे वाढदिवस साजरे केले जात असतात पण आता मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत वाढदिवसा निमित्ताने केक कापणे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. एवढा महाग केक कापल्यावर थोडा केक खायचा आणि बाकीचा सत्कारमूर्ती च्या तोंडाला लावायचा आणि बाकीचा फेकून द्यायचा अस चित्र सध्या दिसते. केक शरीराला दुष्परिणामकारक तर आहेच आपला खर्च ही वाढवणारा आहे तरी आपला वाढदिवस केक न कापता फळे कापून साजरा करा म्हणजे आपला शेतकरी जगेल.. असा संदेश यांनी या वाढदिवस निमित्ताने माणुसकी समुहातर्फ दिला वाढदिवस निमित्ताने आतापर्यंत त्यांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, व्याख्यान असे उपक्रम राबविले आहेत. हा नवीन उपक्रम व हा वाढदिवस साजरा करण्यात आला. अशा नवीन व अभिनंदनीय उपक्रमामुळे कमलाकर माळी यांचे सर्व परीसरात कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत