जळगावात भर दिवसा तरुणाचा निर्घृण खून !
जळगावात भर दिवसा तरुणाचा निर्घृण खून !
लेवाजगत न्यूज जळगाव -तालुक्यातील कानळदा रोडवरील लक्ष्मी जिनिंगच्या मागे असलेल्या एका शेतात परप्रांतीय तरूणाचा तिक्ष्ण हत्याराने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. या गुन्ह्यात एका महिलेला ताब्यात घेतले असून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सुरेश सोलंखी वय-३० रा. सेंधवा मध्यप्रदेश ह.मु.कानळदा रोड लक्ष्मी जिनींगजवळ जळगाव असे मयत परप्रांतीय तरूणाचे नाव आहे.
हे पण वाचा-कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळेंच्या संकल्पातील अपूर्ण कामांची पूर्तता करणार रावेरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी केला निश्चय
याबाबत अधिक माहिती अशी की, कानळदा रोडवरील लक्ष्मी जिनींगजवळ सुरेश सोलंखी हा वास्तव्याला होता. तो लक्ष्मी जिनींगमध्ये ठेकेदारीच्या माध्यमातून कंत्राटी कामगार म्हणून दोन महिन्यांपासून कामाला होता. शुक्रवारी १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेपासून तो बेपत्ता झाला होता. त्यामुळे त्याचे ठेकेदार व सोबत असलेले कामगारांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास लक्ष्मी जिनींगच्या मागच्या बाजूला असलेल्या भरत खडके यांच्या शेतात त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती जळगाव तालुका पोलीसांना कळविण्यात आले.
त्यानंतर अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह फॉरेन्सीक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरेश सोलंखी याचा तिक्ष्ण हत्याराने डोक्याच्या मागच्या बाजूला वार करून निर्घृण खून केल्याचा प्राथमिक माहिती समोर आली. तसेच मृतदेहाच्या ४० ते ५० फुट अंतरावर मंगळसूत्र आणि पायातले जोडवे आढळून आले आहे. पोलीसांनी या वस्तूंसह एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत