हुकूमशाही मोदी सरकारला गाडून लोकशाहीच भारत सरकार आणण्याची गरज ... प्रचंड फौजफाट्याच्या बंदोबस्तात जन सुनावणी घेणारे पुन्हा सत्तेत आले तर रनगाडे लावून बंदर पूर्ण करतील ! एकच जिद्द,वाढवण बंदर रद्दचा,-उद्धव ठाकरे यांचा इशारा...
हुकूमशाही मोदी सरकारला गाडून लोकशाहीच भारत सरकार आणण्याची गरज ...
प्रचंड फौजफाट्याच्या बंदोबस्तात जन सुनावणी घेणारे पुन्हा सत्तेत आले तर रनगाडे लावून बंदर पूर्ण करतील ! एकच जिद्द,वाढवण बंदर रद्दचा,-उद्धव ठाकरे यांचा इशारा...
लेवाजगत न्युज बोईसर:- कोणत्याही परिस्थितीत मोदी व शहा यांना वाढवण बंदर उभारू देणार नाही, एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द,असा इशारा दिला देत मोदी पुन्हा सत्तेत आले तर रनगाडे लावून वाढवण बंदर पूर्ण करतील असा इशारा, महाविकास आघाडी तर्फे शिवसेनेच्या ( उबाठा गटाच्या ) पालघर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी बोईसर येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. पुढे ते आपल्या भाषणात म्हणाले, या बंदराबाबात लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
२५ वर्षांपूर्वी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना हे बंदर रद्द करण्याचे आदेश दिले होते. आज हे भूत पुन्हा कोणी बाहेर काढले. लोकांना बंदर नको असेल तर ते होऊ देणार नाही. माझ्या अडीच वर्षाच्या सरकारने किती विकासकामे केली म्हणून हे गद्दार व भाजपचे नेते गळे काढत आहेत, त्यांना माझे खुले आव्हान तुम्ही व मी दोघे एकाच व्यासपीठावर येऊया, माझ्या सरकारने अडीच वर्षात किती कामे केली व तुम्ही गेल्या दहा वर्षात किती कामे केली हे जनतेसमोर मांडु, यापुढे महाराष्ट्रात मोदींचे नाणे चालणार नाही, या राज्यात फक्त पवार आणि ठाकरे यांचेच नाणे चालणार आहे. एकेकाळी बाळासाहेबांचा एक फोन गेला की दिल्ली चळचळायची आता दिल्लीतून फोन आला की यांच्या दाढ्यांमध्ये वळवळ सुरु होते.
त्यांनी तुम्हाला संपवून टाकले. पालघर जिल्ह्यात खूप काही आहे, ते उध्वस्त करण्यासाठी हे लोक विनाशकारी प्रकल्प लादू पाहत आहे. पर्यटन व आदिवासी संस्कृतीला पोषक, असे प्रकल्प आणा, ते न करता स्थानिकांना उध्वस्त करण्याचे प्रयत्न करतात हे लोक, पण त्यांना ते शक्य करू देणार नाही. या लोकांना आता गाडून टाकले नाहीतर आपल्यावर हुकूमशाही लादण्यात येईल, म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, ही लढाई तुमच्या-आमच्या अस्तित्वाची आहे, म्हणून या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या. यावेळी कॉम्रेड अशोक ढवळे, आ.सुनील भुसारा, आ. विनोद निकोले, खा.संजय राऊत व महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांची भाषणे झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत