एकनाथ खडसे शरद पवार यांची तुतारी सोडून लवकरच कमळ हाती घेणार
एकनाथ खडसे शरद पवार यांची तुतारी सोडून लवकरच कमळ हाती घेणार
वृतसंस्था जळगांव -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपत स्वगृही परतणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यांचा पक्षप्रवेश लवकरच होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. भाजपच्या कोणत्याही नेत्याने अद्याप याची पुष्टी केली नाही. पण जळगावच्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा जोरात सुरू झाली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.
गत काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपत परतणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. पण खडसे यांनी वेळोवेळी हीच चर्चा फेटाळून लावली. पण आता एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची तुतारी सोडून भाजपचे कमळ हातात घेणार असल्याची माहिती आहे. त्यांचा पक्ष प्रवेश लवकरच होईल अशी माहिती आहे.
रक्षा खडसेंनी स्वगृही परतण्याची व्यक्त केली होती इच्छा
उल्लेखनीय बाब म्हणजे खडसे यांच्या स्नुषा तथा भाजप खासदार रक्षा खडसे यांनी नुकतीच एकनाथ खडसेंनी स्वगृही परतावे अशी इच्छा व्यक्त केली होती. या विषयी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश हा वरिष्ठ पातळीवरील निर्णय आहे. पण त्यांच्या मनात काय सुरू आहे हे सर्व काही घडल्यानंतरच आपल्या समोर येईल. रक्षा खडसे यांच्या या विधानानंतर खडसे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपत परतण्याची चर्चा सुरू झाली होती.

रक्षा खडसे व गिरीश महाजन यांच्या सूचक विधानानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपत परतणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते. भाजपने माझा खूप छळ केला. त्यामुळे मी पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी कायम राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्यासोबत राहीन, असे खडसे यांनी या प्रकरणी स्पष्ट केले होते.
तत्पूर्वी, एकनाथ खडसेंनी स्वतः आपल्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडून भाजपमध्ये परतण्याची ऑफर असल्याचा दावा केला होता. तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आपल्याला आपल्या पक्षात येण्याची विनंती केल्याचे ते म्हणाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत