द्रोणागिरी हायस्कुल नामफलक अनावरण व पिण्या च्या टाकी चे शुभारंभ
द्रोणागिरी हायस्कुल नामफलक अनावरण व पिण्या च्या टाकी चे शुभारंभ
उरण (सुनिल ठाकूर)द्रोणागिरी हायस्कूल करंजा मराठी व सेमी इंग्रजी माध्यम द्रोणागिरी हायस्कूल करंजा विद्यालयाच्या पाण्याच्या टाकीला गळती लागली होती. झाडांची मुळे टाकीत शिरल्या मुळे पाणी टाकीत रहात नव्हते.विद्यालयात १००० /११००विद्यार्थि शिक्षण घेत असल्यामुळे, पाण्याची तिव्र टंचाईला सामोरे जावे लागत होते. काही वेळा शाळेय पोशन आहार शिजविण्यासाठी बाहेरून पाणी आणावे लागत होते .याबाबत द्रोणागिरी हायस्कूल करंजा मराठी माध्यमाच्या एस.एस.सी. बॅच १९८१ चे माजी विद्यार्थी श्रीमती सरस्वती कोळी, चंद्रकांत कोळी.वासूदेव कोळी व त्यांचे सहकारी यांचे लक्ष वेधले व त्यांनी पुढाकार घेऊन ५१,०००/रुपयांची मदत केली. करंजा सोसायटी .नवापाडा ग्रामस्थ मंडळ, बळीराम मसण,शाळेचा शिक्षक वर्ग यांनीही आर्थिक मदत केली.त्या मदतीतून पाण्याची टाकी दुरूस्ती केली व विद्यालयाच्या गेटसमोरच्या भिंतीवर कायम स्वरूपाचे सुंदर व सुबक नामफलक बनविले.
४ एप्रिल २०२४ रोजी नामफलकाचे अनावरण व पिण्याच्या पाण्याचा टाकीचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी ८१ च्या बॅचचे माजी विद्यार्थ्यिं ,चाणजे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री अजय म्हात्रे, विद्यालयाचे चेअरमन सिताराम नाखवा,व्हा.चेअरमन के.एल कोळी , मुख्याध्यापिका सौ.सुरेखा म्हात्रे मॅडम, सोसायटीचे माजी चेअरमन शिवदास नाखवा, भालचंद्र कोळी,व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत