धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासह दोघे कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात !
धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासह दोघे कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात !
लेवाजगत न्युज धुळे:- हद्दपारीची कारवाई टाळण्यासाठी तडजोडीअंती कर्मचाऱ्याच्या माध्यमातून दिड लाखांची लाच स्वीकारल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे (सम्राट चौक, शाहू कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 2, बीड) व पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने (रा. प्लॉट नंबर 58, गंदमाळी सोसायटी, देवपूर, धुळे) व पोलीस हवालदार अशोक साहेबराव पाटील (प्लॉट नंबर 25, मधुमंदा सोसायटी, नकाने रोड, देवपूर, धुळे) यांना धुळे एसीबीने अटक केल्याने जिल्ह्यातील पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 35 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ते राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आहेत. राजकीय सहकाऱ्यांशी मतभेद झाल्याने त्यांच्याविरोधात दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल आहे.
या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांनी तक्रारदार यांची भेट घेतली व तुमच्यावर गुन्हे दाखल असल्याने गुन्ह्यांची माहिती काढून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनकडुन प्रस्ताव मागवून तुम्हाला जिल्ह्यातून करण्यात येईल मात्र कारवाई होवू द्यायची नसेल तर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे साहेबांना दोन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून तक्रारदाराला पोलीस निरीक्षक शिंदे यांची भेट घेण्यास सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत