सोशल मीडियावर वादग्रस्त धार्मिक पोस्ट, नाशिकमध्ये मध्यरात्री दगडफेक, तणावः एका संशयिताला अटक केल्यानंतर जमाव नियंत्रणात
सोशल मीडियावर वादग्रस्त धार्मिक पोस्ट, नाशिकमध्ये मध्यरात्री दगडफेक, तणावः एका संशयिताला अटक केल्यानंतर जमाव नियंत्रणात
नाशिक वृत्तसंस्था-सोशल मीडियावर एका धर्मगुरुंबाबत वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्याने बुधवारी सायंकाळच्या नमाजानंतर नाशिक शहरातील उपनगर परिसरात तणाव निर्माण झाला होता. मध्यरात्री १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली. एका गटाने दगडफेक करून दोन ठिकाणी रास्ता रोकोही केला. यानंतर काही वेळातच सुमारे तीन ते चार हजार लोक रस्त्यावर उतरले होते. संशयिताला अटक करण्याच्या मागणीसाठी द्वारका येथेही लोकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने तणाव वाढला होता. पोलिसांनी बॅरेकेटिंग करून रस्ते बंद केले होते. मात्र रात्री १.३० वाजेच्या सुमारास संशयिताला अटक करण्यात आल्याने तणाव निवळला.
उपनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला जोपर्यंत अटक केली जात नाही तोपर्यंत उपनगर पोलिस ठाण्यातून हलणार नाही असा पवित्रा तीन ते चार हजार लोकांनी ठिय्या मांडला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढवला होता. दुसरीकडे पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून संशयिताला अटक केली. त्याला ताब्यात घेतल्याचा व्हिडिओही जमावाला दाखवला, त्यानंतर जमलेली गर्दी हळूहळू कमी होत गेली.
वादग्रस्त पोस्ट करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये. अफवांवर विश्वास ठेऊ नये. शहरात शांतता राखण्यास पोलिसांना मदत करावी.
-संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत