Header Ads

Header ADS

ब्रेकिंग एकनाथराव खडसे यांना दाऊद, छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी


 ब्रेकिंग एकनाथराव खडसे यांना दाऊद, छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी


लेवाजगत न्युज मुक्ताईनगर:- भाजपच्या वाटेवर असलेले आमदार एकनाथराव खडसे यांना दाऊद इब्राहीम आणि छोटा शकील गॅगकडून धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आमदार खडसेंनी अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दिली आहे.


आमदार एकनाथराव खडसे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून त्यांना दि. १५ आणि १६ एप्रिल रोजी फोन करण्यात आले. त्यात बोलणारे व्यक्ती खडसेंना म्हणाले की, हम दाउद इब्राहिम कासर कर के आदमी है हम........ को मार डाला, अब तुम छोटा शकील को मार डालो, नही तो तुमारी खैर नही, अशी धमकी दिली. त्यावर खडसे यांनी विचारले की, तुम जो ये दाउद शकील नाम ले रहे हो. ये कोण है?, मै पहचानता नही. त्यावर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने दाऊद, शकील ये डॉन है, और तुमको मार देंगे, असे बोलून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एकनाथराव खडसे यांनी चौघं मोबाईलवरून धमकी देणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल देईली असून पुढील तपास सपोनि संदीप दुनगहु हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.