भीमजयंती दिनी कन्याशाळेत युवकाचा खून पोलीस ठाण्या समोरील घटना
भीमजयंती दिनी कन्याशाळेत युवकाचा खून पोलीस ठाण्या समोरील घटना
वृत्तसंस्था बुलढाणा -बुलढाणा येथे भीम जयंतीची मिरवणूक ऐन रंगात असताना पोलिस स्टेशन समोरील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या परिसरात एका युवकाचा खून झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, ही घटना डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी घडल्याने जयंती उत्सवालाच गालबोट लागल्याच्या भावना व्यक्त होत आहे. मिरवणुकीला रात्री १२ पर्यंत परवानगी असल्याने ही घटना घडली असावी असे बोलले जाते. घटनेच्या दिवशी मुख्यमंत्री हे बुलडाणा शहरात येऊन गेले होते.
जुना अजिसपूर रोड बुलडाणा येथील २४ वर्षीय युवक आशुतोष संजय पडघान असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध १५ एप्रिल रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. जयंती मिरवणूक सुरु असतानाच शहरातील मुख्य बाजारपेठेतील मागील बाजूस आशुतोष पडघान याच्यावर अज्ञात आरोपींनी चाकूने वार केले तसेच त्याला जखमी अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, मिरवणुकीतील काही जणांना जखमी अवस्थेत आशुतोष दिसताच त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. विशेष दक्षता कक्षामध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मृतक आशुतोष पडघानला हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने जुन्या वादातून त्याची हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आशुतोष पडघान हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्याविरुद्ध २२ गुन्हे दाखल असून त्याला एका वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता, अशी माहिती शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत