भाजपा नेत्या नवनीत राणांना मोठा दिलासा, जात प्रमाणपत्र वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
भाजपा नेत्या नवनीत राणांना मोठा दिलासा, जात प्रमाणपत्र वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था-भाजपा नेत्या आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्या. जे. के महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निर्णय दिला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी हा निर्णय आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला आणि नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचं म्हटलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत