Header Ads

Header ADS

श्रीरंग बारणे यांना तीन लाख मताधिक्याने विजयी करा उरण येथील महायुतीच्या मेळाव्यात पालकमंत्री उदय सामंत यांचे कार्यकर्त्यांना आवाहन


Appeal to the workers of the Udaya Samantha-guardian-minister-to-make-Srirang-Barne-victory-with-three-lakh-votes-in-the-Mahayuti-meeting-at-Uran


 श्रीरंग बारणे यांना तीन लाख मताधिक्याने विजयी करा

उरण येथील महायुतीच्या मेळाव्यात पालकमंत्री उदय सामंत यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

 उरण,  (सुनिल ठाकूर ) : मावळ मतदारसंघात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आप्पा बारणे यांनी विकासकामे केली आहेत. त्या विकासकार्माच्या जोरावर कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचून तीन लाख मताधिक्याने श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन महायुतीच्या कार्यकर्त्यांना उद्योगमंत्री, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

उरण येथील जेएनपीए मल्टीपर्पज हॉलमध्ये मावळ मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ प्रमुख कार्यकर्ता मेळावा रविवारी पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. श्रीरंग बारणे यांचे

 काम हे या मावळ मतदारसंघात उत्तम आहेच. या मतदारसंघाचे उमेदवार हे स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आहेत, असे समजून आजपासून जर आपण संकल्प केला तर बारणे यांना तीन लाखा च्या  वर मताधिक्याने लोकसभेमध्ये पाठवू शकतो आणि आपले तिसऱ्यांदा विजयी होण्याचे स्वप्न पूर्ण साकार करू शकतो, असे सामंत यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार - महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना जिह्वा प्रमुख अतुल भगत, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उमाताई

 मुंडे, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, दिवंगत ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, शिवसेना  तालुका संघटक दिपक ठाकूर , तालुका अध्यक्ष महेंद्र  ,  परीक्षित ठाकूर, ऍड. भार्गव माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर सौ. कुंदा वैजनाथ ठाकूर, प्रविण घासे, धनाजी शेठ ठाकूर शिवसेना महिला प्रमुख मेघा दमडे, माजी सरपंच महेश कडू,तसेच उरण तालुक्यातील महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भाषणे देण्याऐवजी विकासावर बोला!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उरणमध्ये बोलताना महायुतीवर तोंडसुख घेतले होते. त्याला सामंत यांनी सडेतोड उत्तर दिले. चांगले झाले की फुकटचे श्रेय घ्यायची काही लोकांची प्रवृत्ती असते. निवडणुका आल्या की, त्यांना बाळासाहेब ठाकरे, दि. बा. पाटील यांची नावे आठवतात. निवडणूक गेली की त्यांचे फेसबुक लाईव्ह सुरू होते. केंद्र व राज्य सरकारने उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. केवळ भावनिक भाषणे देण्याऐवजी विरोधकांनी विकासावर बोलावे. टीका करायचीच असेल तर तुम्ही बनवलेल्या रस्त्याने या,  नाहीतर पाण्यातून पोहत या, अशी खरमरीत टीका सामंत यांनी केली.

पालक मंत्री उदय सामंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.