सावदा उपबाजार समितीच्या आवारात व्यापारी गड्ड्यात पडून गंभीर जखमी संबंधितांवर कार्यवाही व्हावी मागणी
सावदा उपबाजार समितीच्या आवारात व्यापारी गड्ड्यात पडून गंभीर जखमी
संबंधितांवर कार्यवाही व्हावी मागणी
लेवाजगत न्यूज सावदा - रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अंतर्गत असलेल्या सावदा उपबाजार समिती आवारात नव्याने शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी खोदलेल्या खड्ड्यात सावदा येथील धान्याचे व्यापारी जगन प्रेमचंद नेमाडे मोटरसायकलसह पडून गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळा चा व्हिडीओ बघा-सावदा उपबाजार समितीत, व्यापारी संकुलाच्या पैय्याच्या गड्यात पडलेल्या जखमी व्यापाऱ्यावर डॉ.उमेश पिंपळे यांचे दवाखान्यात उपचार सुरू
शनिवारी रात्री ८वाजता व्यापाराचे काम आटोपून नेहमी प्रमाणे घराकडे परतत असताना ही घटना घडली आहे. जगन नेमाडे यांच्या छातीच्या बरगड्या फॅक्चर झाल्या असून व हाताला मुक्का मार लागल्याची माहिती मिळाली आहे.त्यांना डॉ. पिंपळे यांच्या दवाखान्यात उपचार सुरू आहे. यावेळी सावदा उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक गोळा झाले होते.
नव्याने व्यापारी संकुलाचे बांधकाम होत असलेल्या या जागेस कोणतेही सुरक्षा साधनाचे तजवीज न करता हे काम सुरू केल्याने ही दुर्घटना घडली सुदैवाने नेमाडे हे व्यापारी थोडक्यात बचावले त्यांच्या अंगावर ती जर ही मोटरसायकल गड्ड्यात पडली असती तर आज त्यांना मोठ्या दुर्घटनेस सामोरे जावे लागले असते तरी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी व्यापारी रितेश पाटील यांनी केली आहे.
दरम्यान आधीच बाजार समिती आवारातील अर्धी जागा ही पणन महासंघाला कोल्ड स्टोरेज साठी कृषी उत्पन्न बाजार समितीने ९९ वर्षाच्या करारावर दिली असल्याने गुरांच्या बाजारावर परिणाम झाला आहे .बाजार समितीत जागे अभावी गुरांना बाहेर थांबवून व्यवहार करावे लागत आहे.त्यात शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधल्यास अत्यल्प जागा शिल्लक राहील व परिणामी गुरांच्या बाजारावर मोठा परिणाम होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी या शॉपिंग कॉम्प्लेक्सला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कॉम्प्लेक्स चे काम बंद करावे अशी मागणी आता लावून धरली आहे बाजार समिती सभापती सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेबाबत मला काही माहिती नाही मी बाहेरगावी आहे माहिती घेऊन बोलतो असे सांगितले.
बाजार समिती संचालक सय्यद अजगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की संबंधित ठेकेदाराला सकाळी नोटीस बजावण्यात येणार आहे व योग्य ती कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत