धावत्या रेल्वेतून पडल्याने बामणोदच्या तरुणाचा मृत्यू
धावत्या रेल्वेतून पडल्याने बामणोदच्या तरुणाचा मृत्यू
लेवाजगत न्यूज बामणोद -नाशिक कडून भुसावळ कडे रेल्वेने घरी येत असताना जळगाव जवळ यावल तालुक्यातील तरुण खाली पडला, धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार लोकेश रविराज मराठे. वय १७ वर्ष, रा. बामणोद ता. यावल. असे मयत तरुण मुलाचे नाव असून एक वर्षाचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या आईने त्याला बामणोद येथे महानुभव पंथाच्या आश्रमात ठेवले होते. तेथे त्याच्या गुरुचेही निधन झाले. त्यानंतर हा तरुण इतरत्र कामे करून उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, सोमवारी तो नाशिक कडून भुसावळ कडे येत असताना रेल्वेतून जळगाव जवळ तो खाली पडला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोहेकॉ सचिन भावसार, पोलिस नाईक नरेंद्र चौधरी यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत