Header Ads

Header ADS

सप्तश्रुंगी देवीचे दर्शन घेऊन परत येतांना काळाचा घाला ५ ठार ३ जखमी

5-killed-3-injured while returning-after-visiting-Saptashrungi-Devi.


सप्तश्रुंगी देवीचे दर्शन घेऊन परत येतांना काळाचा घाला ५ ठार ३ जखमी 

लेवाजगत न्यूज नाशिक-नाशिक-दिंडोरी मार्गावरील ढकांबे गावालगत बोलेरो कार व दुचाकीच्या धडकेत तब्बल ५ जण ठार, तर ३ जण गंभीर जखमी झालेत. अपघातग्रस्त कारमधील नागरीक सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन गावाकडे परतत होते. पण रस्त्यातच त्यांच्यावर काळाचा घाला घातला. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

  गत काही दिवसांपासून नाशिक जिल्हा व परिसरात अपघातांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी दुपारी २च्या सुमारास नाशिक- दिंडोरी मार्गावरील ढकांबे गावालगत बोलेरो कार व दुचाकीची जोराची धडक झाली. कारचे टायर फुटल्यामुळे हा अपघात घडला. टायर फुटल्यानंतर कार प्रथम दुचाकीला धडकली आणि त्यानंतर रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील २, तर कारमधील ३ जण जागीच ठार झाले. तर ३ जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले.

    पोलिसांच्या माहितीनुसार, बोलेरो जीपमधील व्यक्ती हे सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतत होते. बोलेरो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मृतांत द्राक्ष व्यापारी रामकेश यादव, मुकेश यादव यांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.