जळगाव जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्या जाहिर
जळगाव जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्या जाहिर
जळगाव, दि. ३०( जिमाका ) शासनाने प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन व बँकीग विभाग वगळून) सन २०२४ या कॅलेंडर वर्षात तीन स्थानिक सुट्या जाहिर केल्या आहेत.
यामध्ये सोमवार, दिनांक १९ऑगस्ट, २०२४ रोजी रक्षाबंधन, सोमवार, दिनांक ०२ सप्टेंबर, २०२४ रोजी पोळा आणि गुरुवार, दिनांक३१ ऑक्टोबर, २०२४ रोजी नरक चतुर्दशी (दिवाळी निमित्त) या सणांसाठी स्थानिक सुटी जाहिर केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत