Header Ads

Header ADS

यावल मध्ये कॉपी प्रकरणी केंद्र प्रमुखासह चौघांवर गुन्हा दाखल


 यावल मध्ये कॉपी प्रकरणी केंद्र प्रमुखासह चौघांवर गुन्हा दाखल

 लेवाजगत न्युज यावल:- शहरातील डॉ. झाकीर हुसेन उर्दू विद्यालयातील केंद्र प्रमुखासह चौघांच्या विरोधात कॉपी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल शहरातील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल येथे गुरुवार इयत्ता दहावीचा इंग्रजीचा पेपर सुरू होता. दरम्यान या परीक्षा केंद्रावर फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या साहयक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी तपासणी केली असता त्यांना एका ब्लॉक मधील विद्यार्थिनी कॉफीचा कागद बाहेर घेवुन फिरतांना दिसून आलीत, यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपुर्णा सिंग यांनी थेट गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार करून या केंद्रा वरील परिक्षा केंद्रप्रमुख सहपर्यवेक्षकासह ४ जणांवर कारवाईचे आदेश दिले यानंतर यावल पोलीस ठाण्यात गटशिक्षण अधिकारी धनके यांच्या फिर्यादीवरून परीक्षा केंद्रावर गैरप्रकार बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यावल शहरात डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल आहे या हायस्कुल मध्ये इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र आहे या केंद्रावर गुरुवारी इंग्रजी चा पेपर होता. तेव्हा येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास फैजपुर विभागीय कार्यालयाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी भेट दिली व वर्गात तपासणी करीत असतांना त्यांना ब्लॉक क्रमांक ६ मध्ये एक विद्यार्थिनी कॉफीचा कागद वर्गाच्या बाहेर फेकतांना मिळून आली.


या अनुषंगाने त्यांनी थेट परीक्षेचे कामकाज पाहणार्‍या यावल चे गटशिक्षण अधिकारी व परीक्षा परिक्षक विश्वनाथ धनके यांना संपर्क साधून यावल पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. त्यांच्या आदेशान्वये केंद्रावरील केंद्रप्रमुख एफ. एच. खान, केंद्र उपप्रमुख तुलसीदास चोपडे, ब्लॉक क्रमांक ६ चे पर्यवेक्षक एस. एस. सोनवणे, मुख्याध्यापक जी. एन. खान या चार जणांच्या विरुद्ध यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व परीक्षा तालुका केन्द्राचे परिरक्षक विश्वनाथ धनके यांनी दिलेल्या फिर्यादी वरून महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकारास प्रतिबंधक अधिनियम १९८२ चे कलम ७,८ कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुढील तपास यावल पोलीस ठाण्यात नव्याने रुजु झालेले पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार व पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.