महिला दिन आणि प्राची निग्रेश पाटील यांच्या वाढदिवसानिम्मित आदीवासी बांधवाना ब्लँकेट व खाऊ वाटप
महिला दिन आणि प्राची निग्रेश पाटील यांच्या वाढदिवसानिम्मित आदीवासी बांधवाना ब्लँकेट व खाऊ वाटप
उरण (सुनिल ठाकूर )८ मार्च महिला दिन आणि ॲड. प्राची निग्रेश पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त विंधणे आदीवासी वाडी, कंठवली आदिवासी वाडी, रानसई ठाकूर वाडी येथेब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
आदिवासी बांधवांसाठी सदैव मायेचा हात पुढे करणारे आणि म्हणूनच .त्या माय-बापांच्या मनाच्या एका कप्प्यात कायम बंदिस्त करून ठेवलेलं नाव म्हणजेच ..सन्माननीय ॲड. निग्रेश पाटील .. समाजसेवेला नवीन आयाम देणारे.... सुप्रसिद्ध वकिल सन्माननीय *ॲड. निग्रेश पाटील यांच्या माध्यमातून सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्यांच्या समाजकार्यमुळे गोरगरीबांच्या मनाला प्रसन्न करण्याकरिता आपुलकीची अनं प्रेमाची हळुवार फुंकर मारत कुणीतरी आपलं आहे याची जाणीव व्हावी या भावनेनं त्यांच्या करीता मायेची भेट* म्हणून सध्याच्या थंडीवर मात करण्यासाठी *ब्लॅन्केट* वाटप केलं आणि तो क्षण डोळ्यांत साठवून ठेवावा असाच होता त्या निरागस माय-बापांच्या अतुरलेल्या डोळ्यांतील ते निरागस भाव पाहून आणि त्या मायेच्या भेटी नंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद पाहून आम्हां सर्वांच मन भारावून गेलं.
ह्या कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शविली ती उरण समालोचन समितीचे अध्यक्ष जगदीश ठाकूर साहेब, लकी स्पोर्ट्सचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, ॲड. रूपेश ठाकुर, यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, अशा प्रकारे समाजकार्य करत असताना जसं मनाला एक वेगळंच आत्मिक समाधान मिळत असतं तसंच आज ह्या निरागस निर्मल चेहऱ्यांच्या डोळ्यांतील आपुलकीच्या भावनांचे ते ऋणानुबंध पाहून मन अक्षरशः भारावून गेलं.
ह्या कार्यक्रमासाठी राज घरत(कंठवली), भूषण डाकी (बोरखार),सुधीर बुवा पाटील,नेत्रा थापा, सानिया पाटील, सार्थक पाटील, जय ठाकूर(चिरले), सह आदि उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत हा सुंदर आणि आनंददायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत