गोव्याच्या भूमीत भगवान परशुरामांच्या पुतळ्याचे अनावरण... गोवा ही योगभूमी - तपोभूमीच्या वतीने समुद्रकिनारी विविध धार्मिक कार्यक्रम
गोव्याच्या भूमीत भगवान परशुरामांच्या पुतळ्याचे अनावरण...
गोवा ही योगभूमी - तपोभूमीच्या वतीने समुद्रकिनारी विविध धार्मिक कार्यक्रम
लेवाजगत न्यूज फैजपूर :-गोवा ही गोमंतकाची आध्यात्मिक भूमी आहे. ती भोगभूमी नसून योग भूमी आहे. या भूमीचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी दि. १६ ते १८ मार्च २०२४ या दरम्यान गोवा येथे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सद्गुरु फाउंडेशन आणि श्री दत्त पद्मनाभम पीठ आयोजित या महोत्सवाचे अध्यक्ष पद्मश्री धर्मभूषण सन्मानित स्वामी ब्रह्मशानंदाचार्यजी गोवा, संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगद्गुरु श्री अविचलदेवाचार्यजी स्वामीजी गुजरात, जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वराचार्यजी माऊली सरकार महाराष्ट्र,श्री वचनानंद स्वामीजी कर्नाटक,परम विदुषी गीतादीदी गुजरात, पू. ब्रह्मीदेवी गोवा, मुख्यमंत्री डॉ.प्रमोदजी सावंत,मंत्री श्रीपादजी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
गोमंतक आणि भगवान परशुरामांची अध्यात्मिक भूमी असलेल्या गोव्याची ओळख भोगभूमी म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे गोवा ही योगभूमी असल्याचे तपोभूमीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. समुद्रकिनारी हवन, नामसंकीर्तन आणि सत्संगाचा अप्रतिम, भव्य आणि दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व तरुणांना गोव्याची धार्मिक अस्मिता जपण्याची शपथही देण्यात आली. विशेष म्हणजे या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी फैजपूर येथील सतपंथ रत्न महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनाही आमंत्रण असल्याने ते मथुरेहून थेट गोव्याला गेले होते.
उपस्थित मान्यवर संत महंतांच्या उपस्थितीत समुद्रकिनारी भगवान परशुरामजींच्या भव्य पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत