Header Ads

Header ADS

उलवे नोड येथे शौचालय व ओपन जिम चे प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते लोकार्पण

 

Ulavē-nōḍa-yēthē-śaucālaya-va-ōpana-jimacē-pritama-mhātrē-yān̄cyā-hastē-lōkārpaṇa

उलवे नोड येथे शौचालय व ओपन जिम चे प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते लोकार्पण

उरण (सुनिल ठाकूर )सचिन राजें येरुणकर ह्यांच्या पाठपुराव्या मुळे पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते प्रितम जे. म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त  जानेवारीमध्ये उलवे येथे तलाव स्वच्छता मोहीम घेण्यात आली होती. त्यावेळी तेथील रहिवासी आणि महिलांनी तलाव परिसरात शौचालय आणि ओपन जिमची आवश्यकता आहे अशी प्रितम म्हात्रे   यांच्या कडे मागणी केली होती.त्यानुसार गव्हाण ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी पाठपुरावा करून  तलाव परिसरात शौचालय आणि जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून ओपन जिम उभारणी करून आज लोकार्पण केले.

       याप्रसंगी आम्ही उलवेकर महिला मंडळाच्या पुढाकाराने महिला सक्षमीकरणाचाच एक भाग म्हणून तिथे १०० टक्के महिलांसाठी विविध वस्तूंचे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले होते. याप्रसंगी  प्रितम जे. म्हात्रे यांच्यासोबत गव्हाण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य सोबतच उलवे मधील रहिवासी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.