Header Ads

Header ADS

Lok Sabha Elections 2024: शनिवारी जाहीर होणार लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम! टप्पे किती? कुठे कधी मतदान? सगळ्या प्रश्नांची मिळणार उत्तरं

 

Śanivārī-jāhīra-hōṇāra-lōkasabhā-nivaḍaṇukīcā-kāryakrama-ṭappē- kitī-kuṭhē-kadhī-matadāna-sagaḷyā-praśnān̄cī-miḷaṇāra-uttara

Lok Sabha Elections 2024: शनिवारी जाहीर होणार लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम! टप्पे किती? कुठे कधी मतदान? सगळ्या प्रश्नांची मिळणार उत्तरं

वृत्तसंस्था नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज शुक्रवार रोजी बैठक घेण्यात आली. लोकसभा निवडणूक आणि आचारसंहिता बाबत शनिवारी १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिले आहे. याबाबत लोकसभा निवडणूक २०२४ चे वेळापत्रक देखील शनीवारी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

    केंद्रीय निवडणूक आयोगाची शुक्रवारी दुपारी बैठक घेण्यात आली. ही बैठक ४५ मिनीटे चालली. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखासंदर्भात माहिती देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केली जाणार आहे. त्यासोबतच उद्या दुपारनंतर देशभरात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

   देशातील लोकसभा निवडणूक आठ टप्प्यात होण्याची शक्यता असून साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्यात या निवडणूका होण्याची दाट शक्यता आहे. या सोबत काही राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या तारखाही जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली आहे.

२०१९ ला १० मार्च रोजी घोषणा

गेल्या वेळी २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांची तारीख १० मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. गेल्या वेळी ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान टप्प्याटप्प्याने लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. गेल्या वेळी ६७.१ टक्के मतदान झाले होते. तर २३ मे रोजी मतमोजणी झाली. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे ९७ कोटी लोक मतदान करणार आहेत. यावेळी निवडणुकीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली जातील, असा दावा आयोगाने केला आहे.

काय आहे आदर्श आचारसंहिता !

निवडणूक आचारसंहिते दरम्यान मतदारांना पैसे वाटणे, भेटवस्तू देणे, लालूच दाखवणे, आमिष देणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. तसेच सरकारला विकासकामांची किंवा मतदारांवर प्रभाव पडले, अशी कोणताही घोषणा करता येत नाही. तसेच शासकीय अधिकाऱ्याची बदली करता येत नाही. अन्यथा ते आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.