Header Ads

Header ADS

सासऱ्याकडून जावयाचा निर्घुण खून ; धक्कादायक कारण आले समोर !


 सासऱ्याकडून जावयाचा निर्घुण खून ; धक्कादायक कारण आले समोर !


लेवाजगत न्युज बदलापूर:- काही दिवसांपूर्वी बदलापूर-मुरबाड रस्त्यावर मृतावस्थेत आढळलेल्या योगेश केणे या ३८ वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दारू पिऊन शिवीगाळ करत पेंढ्याला आग लावण्याची धमकी दिल्याने संतापलेल्या सासऱ्याने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.


 बदलापूर-मुरबाड रस्त्यावरील मोऱ्याचा पाडा या गावात बारवी नदीवरील पुलाखाली, १ मार्च रोजी दगडावर योगेश केणे (३८) याचा मृतदेह आढळून आला होता. कुळगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तसेच ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाटे, मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे आदींच्या मार्गदर्शनाखाली कुळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि गोविंद पाटील, पोह. डी. पी. केंगार, पवार, खडताळे, पोशि. राहुल दाभाडे यांच्या तपास पथकाची उभारणी करून पुढील तपास सुरू करण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.