रेक्विएम या वार्षिक संगीत महोत्सवाच्या चौथ्या आवृत्तीसाठी एनएमआयएमएस् नवी मुंबई रंगली ‘इंडी ओएसीस’च्या रुपात
रेक्विएम या वार्षिक संगीत महोत्सवाच्या चौथ्या आवृत्तीसाठी एनएमआयएमएस् नवी मुंबई रंगली ‘इंडी ओएसीस’च्या रुपात
लेवाजगत न्यूज उरण (सुनिल ठाकूर )– एसव्हीकेएम एनएमआयएमएस् नवी मुंबईच्या वतीने अलीकडेच त्यांच्या रेक्विएम या अतिशय यशस्वी वार्षिक संगीत महोत्सवाच्या चौथ्या आवृत्तीची सांगता झाली. दिनांक २६ ते २८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान सुमारे तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाची संकल्पना ‘इंडी ओएसीस’ वर आधारित असून सांगीतिक उत्सवाच्या सोबतीने क्रीडा, धमाल-मजा अनुभवता आली. सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित असलेल्या या महोत्सवात संगीतासह लक्षवेधी शिक्षणविषयक अनुभवाचे जतन करण्यात आले, तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सामाजिक सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणे, स्थानिक कला, हस्तकला आणि छोट्या व्यवसायांना पाठिंबा देणे, समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमा आणि पाककलेचा आनंद यासारखे सामाजिक व्याप्तीशी संबंधित उपक्रम देखील यावेळी आयोजित करण्यात आले.
रेक्विएम ४.० चे अनावरण भव्य बॅनर ड्रॉप करून करण्यात आले, त्यानंतर अप्रतिम उदघाटन सोहळ्याची पूर्तता झाली. हा महोत्सव संगीत, कला, क्रीडा आणि सामाजिक जागृती यांचे मंत्रमुग्ध मिश्रण असल्याचे सिद्ध झाले. महोत्सवाच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये बॉलीवूड सोलो, क्लासिकल, वेस्टर्न म्युझिक, बॅटल ऑफ बँड्स, पॉवर ऑफ इन्स्ट्रुमेंट्स आणि रॅप-इट-आउटवरील संगीत स्पर्धांचा समावेश होता. सर्वात मोठे आकर्षण ठरलेल्या 'स्टारनाइट' मध्ये राघव चैतन्य, माही मुखर्जी आणि कुशल मंगल यांच्या सादरीकरणांचा समावेश होता.
उत्सवाच्या इतर विभागांमध्ये इंडी बाजार- चैतन्यशील संगीत आणि कारागीरांच्या शिल्पकलेचे सर्जनशील मिलाफ, जिथे प्रत्येक कलाकृती उत्कटता आणि चिकाटीने कथा सांगते. क्रेव्हयार्ड- पाककला अनुभव देत तालांवर नाचताना प्रत्येक इच्छा पूर्ण करत गेला. महोत्सवाच्या चौथ्या आवृत्तीत सहभागीदारांकरिता आव्हानात्मक प्रकार आणि मजेदार वळणांचा रिले कोर्स-रिप्ले अशा रोमांचक क्रीडा स्पर्धांचाही समावेश होता. रेक्विएम’ने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने 'आशाएं’ या मजेदार कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. हा कार्यक्रम मुलांना आनंद मिळवून देण्यासाठी, सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासह विविध खेळ आणि उपक्रमांद्वारे बक्षीसरुपात प्रोत्साहन आणि कौतुकाला चालना देत सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी समर्पित आहे.
एसव्हीकेएम’च्या एनएमआयएमएस् नवी मुंबई कॅम्पसचे संचालक डॉ. शुभाशीष भट्टाचार्य म्हणाले, "संगीत भिन्न विचारांना उत्तेजन देते, मनःस्थिती सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करते, शारीरिक आणि मानसिक आरोग्य मजबूत करते हे अभ्यासातून आढळते. या महोत्सवाच्या माध्यमातून, संगीतातील सहभागाला प्रोत्साहन देणे, एक कला म्हणून संगीताची प्रशंसा करण्याची भावना विकसीत करणे, विविध पार्श्वभूमीच्या कलाकारांना सर्वसमावेशक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, संगीतावरील सामायिक प्रेमाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्यासाठी विद्यार्थ्यांना संवेदनशील करणे आणि समाजाला परत देण्याची संवेदनशीलता वृद्धिंगत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. रेक्विएमसोबतचा आमचा प्रवास खरोखरच आश्चर्यकारक आहे आणि महोत्सवाच्या अनेक यशस्वी आवृत्त्यांचे आयोजन करणे आमचे भाग्य समजतो".
या कार्यक्रमाचा समारोप स्टारनाईटसह झाला. हा एक असा मंच ज्यावर संगीत उद्योगातील दिग्गज आणि उदयोन्मुख कलाकारांचा प्रयत्न छाप पाडण्याचा होता, मंत्रमुग्ध प्रेक्षकांसाठी तितक्याच प्रेमाने आणि आनंदाने कला सादर करत होते. एसव्हीकेएम एनएमआयएमएस, नवी मुंबई कॅम्पसच्या संगीत समितीची स्थापना विद्यार्थ्यांमधील संगीत कलागुणांना प्रोत्साहन देणे, नियमितपणे संगीत महोत्सव आयोजित करण्यासाठी करण्यात आली. या माध्यमातून रसिकांसाठी अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी आपले आयुष्य वेचलेल्या सर्व प्रतिभावान कलाकारांना सलाम करणारा रेक्विएम हा एक असा महोत्सव आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत