रक्षा खडसे यांना रावेर मधून उमेदवारी तर जळगावातून स्मिता वाघ
रक्षा खडसे यांना रावेर मधून उमेदवारी तर जळगावातून स्मिता वाघ
लेवाजगत न्यूज जळगाव-भारतीय जनता पार्टीने रावेरातून रक्षा खडसे यांना तर जळगावातून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजपचे आज दुसरी यादी जाहीर केली असून २० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात जळगावातून स्मिता वाघ तर रावेरातून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव आणि रावेरमधून नेमके कुणाला तिकिट मिळणार याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. यात जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकिट कट झाले असून त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाली आहे. तर रावेरमधून मात्र रक्षा खडसे यांना तिसर्यांदा पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे.
रावेर लोकसभा कडे लक्ष लागून असलेल्या मतदार संघात आज उमेदवारी जाहीर झाल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे काय भूमिका बजावतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. याबाबत नागरिक तर्कवितर्क व चर्चा करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत