डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्रात आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड करिता कॅम्पचे आयोजन
डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्रात आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड करिता कॅम्पचे आयोजन
लेवाजगत न्यूज उरुळी कांचन: भारत सरकार आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग अंतर्गत प्रायमरी हेल्थ सेंटर व डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने येथे दुर्लक्षित घटकांसाठी आभा कार्ड व आयुष्यमान हेल्थ कार्ड काढण्यासाठीच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले होते. या कॅम्पमध्ये दोनशे नागरिकांना आभा कार्ड, व एकशे वीस नागरिकांना आयुष्यमान हेल्थ कार्ड काढण्यासाठी सहकार्य करण्यात आले. या कॅम्पमध्ये अभिषेक गवारे, बलराम सिंग, सीमा चव्हाण यांनी नागरिकांना तांत्रिक सुविधा पुरविण्यात. ज्येष्ठ समाजसेवक डॉ .रवींद्र भोळे संस्थापक ट्रस्टी डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन उरुळीकांचन यांनी आभा कार्ड बद्दल माहिती देताना सांगितले की आभा कार्ड आयुष्यमान भारत स्वास्थ्य मिशनचे अंतर्गत हेल्थ कार्ड आहे. डिजिटल हेल्थ प्रोफाइल व आरोग्य विषयक जुने रेकॉर्ड तयार करण्याकरता हे अत्यंत महत्त्वाचे आहे . त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पी. एम. जे. ए .वाय अंतर्गत आयुष्यमान हेल्थ कार्ड काढण्यात येते. दारिद्र रेषेखालील नागरिकांना मोफत आरोग्यविषयक सुविधा घेण्याकरिता या आयुष्यमान हेल्थ कार्ड चा उपयोग होतो. याकरिता प्रत्येक नागरिकांनी आपले आभा कार्ड काढावेत, म्हणजे शासनाच्या सुविधांचा उपयोग घेता येईल. गरीब नागरिकांकरिता केंद्र सरकार व राज्य सरकार राबवित असलेल्या विविध आरोग्य विषय उपक्रम तळागाळातील लोकांसाठी खूप उपयुक्त आहेत असे मतज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ.रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. या हेल्थ कॅम्पला पद्मश्री डॉक्टर मणीभाई देसाई प्रतिष्ठान क्रीडा युवा मंत्रालय, नीती आयोग, एम एस एम इ मंत्रालय दिल्ली सलग्नित, मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट आयएसओ प्रमाणित नीती आयोग सलग्नित संस्थेतील कार्यकर्त्यांनी सहकार्य केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत