Header Ads

Header ADS

मनुष्य अमर नाहीं ह्याचें ज्ञान होणे म्हणजेच शिवतत्व-हभप डॉ रवींद्र भोळे


 

मनुष्य अमर नाहीं ह्याचें ज्ञान होणे म्हणजेच शिवतत्व-हभप डॉ रवींद्र भोळे

गुरुळी पुरंदर  पुणे (कैलास मठ): शिवतत्वामुळे शाश्वत जीवनात अमृताच्या उत्पत्तीचे ज्ञान होते. तर शिवतत्व हे शवतत्वाप्रमाणे स्मशानभूमीत काहीही उत्पन्न होत नाही, किंवा काहीही शिल्लक राहत नाही असा संदेश देते. समुद्रमंथन करून शिवाने तिन्ही जगाचे रक्षण केले. विष प्राशन करून मनुष्य जातीला मृत्यूपासून वाचवले. म्हणून महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मनुष्याने दीर्घसूत्री न राहता, अनेक पिढ्यांचा विचार न करता विरक्त होऊन प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्गानुसार सत्कर्म करून सात्विक त्यागाचे पालन करावे. जगाच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करावा. पंचमहाभूतानंतर शिवतत्व सुरू होते. शिवतत्व अमर आहे आणि शिवतत्व महाकालही आहे. मनुष्य अमर नाही ह्याचे ज्ञान होणे म्हणजे शिवतत्व समजणे असे मत ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार हभप डॉ.रविंद्रजी भोळे यांनी येथे व्यक्त केले. ह भ प शांताराम गिरी महाराजांच्या प्रेरणेने ,उरुळी ग्रामस्थांच्या सौजन्याने येथे अखंड हरिनाम सप्ताह, महाशिवरात्रीच्या सोहळानिमित्ताने व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन कैलास मठ येथे करण्यात आले होते. याप्रसंगी उरुळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रवचनात डॉ.रवींद्र भोळे पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले की सात्विक त्याग , सात्विक कर्म व सात्विक व्यक्तीच दया, धर्म करू शकते. भगवान शंकर ह्यानी अनेक प्राणी मात्रांवर दया केली. अशा आख्यायिका आहेत. आपण सात्विक कर्म करून ,व्यसनमुक्त राहून ,सतपुरुष बनण्याचा प्रयत्न करावा. ह्या कार्यक्रमाला प्रामुख्याने संपत खेडेकर,परशुराम खेडेकर, उत्तम नामदेव खेडेकर, बापूसाहेब मार्तंड खेडेकर, विठ्ठल खेडेकर गुरुजी, अरुण महाडिक, कैलास मास्तर खेडेकर, ह भ प अविनाश बोरी ऐंदी यांचे सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, गावकरी ,विनाकरी, माळकरी ,शिवभक्त,भाविक भक्त उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ मंडळी गूरुळी पुणे मुंबई यांनी केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.