Header Ads

Header ADS

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, EC कडून सात टप्प्यातील कार्यक्रम जाहीर, महाराष्ट्रात केव्हा होणार मतदान?

Lok Sabha-election-bugle-sounded-from-Election-Commission-announced-seven-phase-programme-when-voting-will-take-place-in-Maharashtra


लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, EC कडून सात टप्प्यातील कार्यक्रम जाहीर, महाराष्ट्रात केव्हा होणार मतदान?

  लेवाजगत न्यूज नविदिल्ली-देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने सात टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. त्यानुसार १९ एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर, महाराष्ट्रातही ५ टप्प्यांत निवडणूक होणार आहे. यंदा १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक होत आहे.

हे पण बघा-भारतीय निवडणूक आयोगाची लोकसभा निवडणूक 2024 बाबतची पत्रकार परिषद लेवा जगत वरती लाईव्ह बघा

https://youtube.com/live/Im2krSwbGws?si=VjWkckr_uWeZGScN

२०१९ साली स्थापन झालेल्या मोदी सरकारचा कार्यकाळ ६ जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे देशात लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येत आहे. त्यानुसार, १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार असून २ जून रोजी सात टप्पे संपणार आहेत.




केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार म्हणाले, देशात लोकसभा निवडणूक ५४३ जागांवर निवडणूक होणार आहे. सात टप्प्यात ही निवडणूक होणार असून पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे.

   देशात सात टप्प्यात निवडणूक होणार

फेज १ – १९ एप्रिलफेज २ – २६ एप्रिलफेज ३ – ७ मेफेज ४ – १३ मेफेज ५ – २० मेफेज ६ -२५ मेफेज ७ – १ जून


कोणत्या राज्यात किती टप्प्यांत होणार मतदान?

अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगढ, दादरा नगर हवेली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड आदी राज्यांत एका टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.


कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर या राज्यांमध्ये दोन टप्प्यांत मतदान होईल. तर, छत्तीसगड, आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान होईल. ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये चार टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान होईल. तसंच, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत मतदान होणार आहे.

   महाराष्ट्रात पाच टप्प्यांत होणार मतदान

महाराष्ट्रात ४८ जागांसाठी पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान ५ जागांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला होणार असून यावेळी ८ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेत ११ जागांसाठी मतदान होणार आहे. तर, १३ मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील प्रक्रियेतही ११ जागांसाठी मतदान होईल. २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार असून १३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल.

   महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?️

️पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर


️दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी


तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले


️चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड


पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ


मतमोजणी – ४ जून

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.