Header Ads

Header ADS

खंडोबाच्या जेजुरीत अफूच्या बेकायदेशीर पिकावर पोलिसांची धाड

Khaṇḍōbāchyā-jējurīta-aphūchyā-bēkāyadēśhīra-pikāvara-pōlisān̄chī-dhāḍa


खंडोबाच्या जेजुरीत अफूच्या बेकायदेशीर पिकावर पोलिसांची धाड

  जेजुरी (सुनिल ठाकूर ) प्रख्यात कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी पंचक्रोशीत असलेल्या जेजुरी मोरगाव मार्गांवरील मावडी गावाच्या हद्दीत असलेल्या जगताप वस्ती परिसरात एक शेतकरी इसामाच्या शेतात अफूचे पीक असल्याची खात्री लायकी माहिती जेजुरी पोलीस स्थानकस मिळताच  पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे धडाकेबाज सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, हवालदार तात्यासाहेब खाडे,उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार सोमनाथ चिंतारे हिरामण पवार, शुभम भोसले भानुदास सरक, पोलीस मित्र नानसाहेब घोघरे या पथक  गुरुवारी दुपारी रवाना झाले गाडीचा रस्ता संपताच  काट्या कुट्यातून तीन ते चार किलोमीटर पोलिसांनीl मावडी जगताप मळा येथे धाड टाकून 76560 रुपयांचे अफूचे 38 किलो बेकायदेशीर पीक लागवड करण्याच्या आरोपाखाली आरोपी किरण पुंडलिक जगताप (40) रोहिदास चांगदेव जगताप(55) सह ताब्यात घेतले.  असून आरोपीला पोलीस गाडीतून आणताना मावडी गावातच पोलीस व्हॅन पंचर झालीं अधीच पोलिसांची झालेली दमछाक त्यातच जुन्या गाड्या असलेल्याने पोलिसांचे नाहक हाल झाले जेजुरी तीर्थक्षेत्र आणि आउद्योगिक वसाहत असल्यामुळे सुसंज्ज आशा आधुनिक पोलीस व्हॅन ची आवश्यकता असल्याचे चित्र दिसून आले आहे वाकचौरे यांच्या आगमनाने जेजुरीच्या अनेक अवैद्य धंदयांना मोठा आळा बसला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.