Header Ads

Header ADS

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक क्रिकेट संघ भुसावळ नमो क्रिकेट चषकाचा सहभागी १६ संघांमधून विजेता


 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक क्रिकेट संघ भुसावळ नमो क्रिकेट चषकाचा सहभागी १६ संघांमधून विजेता



लेवाजगत न्युज जळगाव:- अंतिम सामना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक क्रिकेट संघ भुसावळ आणि फ्रेंड्स क्रिकेट क्लब भुसावळ यांच्यात झाला. अंतिम सामन्यात फ्रेंड्स क्रिकेट क्लब यांनी चार ओव्हर मध्ये 21 धावांचे आव्हान प्राथमिक शिक्षक संघाला दिले ते होते. अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात प्राथमिक शिक्षक संघाने 3.1ओव्हर मध्ये २ विकेट राखून पूर्ण केले.

कर्णधार समाधान जाधव यांना जिल्हाध्यक्ष भाजपा जळगाव यांच्या हस्ते रोख पाच हजार रुपयांचे पारितोषिक, एक ट्रॉफी आणि सहभागी सर्व खेळाडूंना सन्मान चिन्हदेऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले.






भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी भुसावळ शहर नमो चषक अंतर्गत भुसावळ तालुक्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षकांसाठी भव्य नमो क्रिकेट स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते.



स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते मशाल पेटवून आणि नारळ फोडून करण्यात आले. मशाल सर्व उपस्थित कर्णधार यांच्या हातात देऊन मैदानाला एक पूर्ण फेरी मारून उद्घाटन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्ष खासदार रक्षाताई खडसे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की सध्या शिक्षकांना अनेक कामांचा व्याप वाढलेला आहे.अनेक ऑनलाईन कामे करावी लागत असल्याने शिक्षकांवर  त्यांच्यावर विविध कामांचा बोजा पडत आहे. शिक्षकांना त्यांच्या कामापासून विरंगळा मिळावा. त्यांचा माईंड फ्रेश व्हावा. माईंड फ्रेशनेस मधून विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे. यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं.



बक्षीस वितरण समारंभ अध्यक्ष अमोल जावळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं भुसावळ तालुक्यात शिक्षकांसाठी प्रथमच अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेचा आयोजन करण्यात आलेल आहे. यामध्ये सहभागी शिक्षकांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत असून सर्व शिक्षक उत्साहाने खेळ खेळले. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाल्यामुळे आता जिल्हा स्तरीय  क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सर्व उपस्थित कर्णधारांमधून समाधान जाधव यांना मनोगत व्यक्त कराण्याची संधी देण्यात आली.


मनोगता मधून त्यांनी भाजपा शिक्षक आघाडी आयोजक यांनी शिक्षकांना खेळण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. सर्व माध्यमच्या आणि व्यवस्थापनाचे खाजगी प्राथमिक, जिल्हा परिषद, नगरपालिका, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी  यांना एकत्र येण्याची संधी मिळाली. स्पर्धेचा आनंद घेता आला. याबद्दल आयोजक यांचे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.यापुढेही शिक्षकांसाठी वर्षातून एकदा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची विनंती केली.


क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी युवराज लोणारी, परीक्षेत बऱ्हाटे,  प्रमोद नेमाडे, किरण कोलते,मनोज बियाणी राजेंद्र आवटे,गिरीश महाजन, सतीश सपकाळे, आणि आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा प्रमुख तुषार चिंधळे, बी एन पाटील,सुनील वानखेडे, इरफान शेख,गणेश त्रिपाठी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.