Header Ads

Header ADS

फुगा घशात गेल्याने चिमुकल्याच्या मृत्यू; इचलकरंजीतील घटना

Ichalkaranji incident, death of toddler due to balloon-intake


फुगा घशात गेल्याने चिमुकल्याच्या मृत्यू; इचलकरंजीतील घटना

लेवाजगत न्यूज कोल्हापूर : रंगीबेरंगी फुगे म्हणजे लहान मुलांचा जीव की प्राण. पण या फुग्याला नीट हाताळले नाही तर प्रसंगी जीवावरही बेतू शकते. अशीच एक दुर्दैवी घटना मंगळवारी इचलकरंजीत घडली आणि एका बालकाला जीव गमवावा लागला. वाढदिवसाच्या जुन्या रबरी फुग्याबरोबर चिमुकले बहिण- भाऊ नातेवाईकांच्या समोर घरात खेळत होते. फुगवत असलेला फुगा अचानक चिमुकला गौरांश अमित लगारे ( वय ३ वर्षे ) यांच्या घशात जावून अडकल्याने श्वास कोंडल्याने मृत्यु झाला. ही घटना हुतात्मा अण्णा रामगोंडा शाळेनजीक घडली असून यांची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.

     याची माहिती अशी, गौरांश यांचा एक महिन्यापूर्वी दुसरा वाढदिवस नातेवाईकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला होता. मंगळवारी दुपारी तो आणि त्यांची चिमुकली बहिण स्वरा हे बहिण- भाऊ घरात नातेवाईकाच्या समोर वाढदिवसावेळी आणलेल्या जुन्या फुग्याबरोबर खेळत होते. याच दरम्यान फुगवत असलेला फुगा अचानक गौरांश लगारे या चिमुकल्याच्या घशात जावून अडकला. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काही वेळातच तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. घाबरून गेलेल्या नातेवाईकांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने, त्याला पुढील उपचारासाठी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेले. तपासणी केली असता त्यांचा उपचारापूर्वी त्या निष्पाप गौरांश लगारे या बालकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यानंतर मुलाच्या घरावर शोककळा पसरली. आपला हसता-खेळता चिमुकला गौरांश अशा प्रकारे जग सोडून जाईल यावर मुलाच्या आईचा आणि कुटुंबीयांचा विश्वासच बसला नव्हता.


कोणती दक्षता घ्यावी?

मुलांच्या हाती फुगा फुगवायला देणे टाळावे. लहान मुलांच्या हालचाली फार चपळ आणि अनपेक्षित असतात. कोणत्या क्षणाला ते काय करतील याचा अंदाज लावता येत नाही. त्यामुळे धोकादायक गोष्टींपासून त्यांना दूर ठेवावे. मात्र काही पालक याकडे दुर्लक्ष करीत,  काही पालक मुलांच्या हातात रबरी फुगे, इलेक्ट्रिक खेळणी देतात. अशा गोष्टींमुळे अनेकदा अपघात होण्याचीही शक्यता असते. रबरी फुगा तुलनेने कमी घातक मानला जातो. कारण तो वजनाने अतिशय हलका आणि साधा असतो. मात्र इचलकरंजीतमध्ये घडलेल्या या घटनेनंतर रबरी फुगादेखील घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या लहान मुलांना रबरी फुगे फुगवण्यासाठी देणे शक्यतो टाळले पाहिजे किंवा फुगे फुगवताना स्वतः त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.