धुळवडीचा रंग बेरंग : आंघोळीसाठी तलावावर गेलेल्या धरणगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू
धुळवडीचा रंग बेरंग : आंघोळीसाठी तलावावर गेलेल्या धरणगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू
लेवाजगत न्युज धरणगाव:-तालुक्यातील जांभोरे गावाजवळ रंगपंचमी खेळून आंघोळीसाठी गेलेल्या धरणगाव येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जितेंद्र माळी (वय 20 रा. लोहार गल्ली), असे मयत तरुणाचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, सकाळी रंगपंचमी खेळल्यानंतर जितेंद्र हा आपल्या तीन ते चार मित्रांसोबत धरणगावजवळ असलेल्या जांभोरा गावालगत असलेल्या तलावावर मित्रांसह पोहण्यास गेला होता. परंतु थोड्याच वेळात जितेंद्र बुडायला लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. साधारण तीन ते चार तासाच्या प्रयत्नानंतर जितेंद्रचा मृतदेह तलावातून काढण्यात यश आले. दरम्यान, रंगपंचमीच्या दिवशीच तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाल्यामुळे धरणगावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. तर मयत जितेंद्रच्या आई-वडिलांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत