पत्नीचे विवाहबाह्य शारिरिक संबंध ठेवणे गुन्हा नाही–राजस्थान हायकोर्ट
पत्नीचे विवाहबाह्य शारिरिक संबंध ठेवणे गुन्हा नाही – राजस्थान हायकोर्ट
वृत्तसंस्था जयपूर- राजस्थान हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. दोन वयात आलेल्या व्यक्ती विवाहबाह्य संबंध ठेवत असतील, तर तो कायद्याने गुन्हा ठरत नाही असा निकाल हायकोर्टाने एका प्रकरणात दिला आहे. संपूर्ण प्रकरण असे आहे की, एका नवऱ्याने बायकोचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नवऱ्याने कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याच्या वकिलाने दावा केला की, महिलेने मान्य केले की, संजीवसोबत तिचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्यामुळे आयपीसीच्या कलम ४९४ आणि ४९७ अंतर्गत हा गुन्हा आहे.
वकिलाने सामाजिक नैतिकतेच्या रक्षणासाठी न्यायालयाला आपल्या अधिकाराचा वापर करण्याची विनंती केली. कोर्टात त्यांच्या बायकोने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आणि त्यात लिहले की, तिचे अपहरण झालेले नाही, मी माझ्या मर्जीने आरोपी संजीवसोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहते आहे. तिने तिच्या मर्जीने घर सोडलं व संजीव सोबत राहते. त्यावर न्यायालयाने म्हटले इथे आयपीसी कलम ४९४ लागू होत नाही. कारण नवरा आणि बायको दोघांपैकी एकाने दुसरा विवाह केलेला नाही. विवाह झाल्याच सिद्ध होत नाही, तो पर्यंत लिव-इन-रिलेशनशिप सारख्या नात्याला कलम ४९४ लागू होत नाही. शारीरिक संबंध फक्त वैवाहिक जोडप्यांमध्ये असतात. पण लग्नाव्यतिरिक्त दोन वयात आलेल्या व्यक्ती परस्पर सहमतीने संबंध ठेवत असतील, तर तो गुन्हा ठरत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत