Header Ads

Header ADS

गुर्जर व इतर गुर्जर पोटजातींना केंद्र सरकारच्या ओबीसी यादीत समावेश करा राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांना निवेदनाद्वारे खासदार रक्षाताई खडसे यांची मागणी

 

Gurjars-and-other-Gurjar-sub-castes-be-included-in-the-Central-Government's-OBC-List-Demand-for-Special-Protection-Khadse-Through-Report-to-Chairman-Hansraj-Ahir-Commission-National-Backward-Classes-Commission


गुर्जर व इतर गुर्जर पोटजातींना केंद्र सरकारच्या ओबीसी यादीत समावेश करा राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांना निवेदनाद्वारे खासदार रक्षाताई खडसे यांची मागणी

लेवाजगत न्यूज सावदा- गुर्जर व इतर गुर्जर पोटजाती यांचा महाराष्ट्र राज्यात ओबीसी प्रवर्गात समावेश होत असून, तर केंद्र सरकार ह्यांचा खुल्या प्रवर्गात समावेश करते, त्यामुळे अनेक वर्षापासून गुजर समाजातील मुलांचे शिक्षण व नोकरी मध्ये नुकसान होत असून, समाजाचा केंद्राच्या ओबीसी प्रवर्गात समावेश करावा ही मागणी आहे. त्याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे ह्या मागील ७-८ वर्षापासून पाठपुरावा करत असून, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष श्री.हंसराज अहिर हे रावेर लोकसभा अंतर्गत भुसावळ येथे आले असता, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी त्यांची भेट घेऊन, महाराष्ट्र राज्यातील गुर्जर व इतर गुर्जर पोटजातींना केंद्र सरकारच्या ओबीसी यादीत समावेश करणे बाबत मागणी केली.

    दिलेल्या निवेदनात गुर्जर व इतर गुर्जर पोट जाती उदा. लेवे गुर्जर, रेवे गुर्जर, रेवा गुर्जर, सूर्यवंशी गुर्जर आदींचा समावेश असून, उद्या मुंबई येथे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष श्री.हंसराज अहिर हे राज्य शासन यांच्यासह बैठक घेणार असून, त्यामध्ये सदर मुद्दा उपस्थित करणार असून, राज्याने सकारात्मक विचार करून प्रस्ताव सादर केल्यास, केंद्र सरकारच्या वतीने गुर्जर व इतर गुर्जर पोट जातींना ओबीसी यादीमध्ये लवकरच समावेश करून मान्यता देण्यात येईल असे आश्वासन राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष श्री.हंसराज अहिर यांनी यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिले. यामुळे गुर्जर व इतर गुर्जर यांना केंद्र सरकार व राज्यसरकारच्या विविध योजनांच्या लाभासह शिक्षण व नोकरीत लाभ मिळवण्यासाठीचा मार्ग खुला होऊन निश्चित गुर्जर व इतर गुर्जर यांना दिलासा मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.