Header Ads

Header ADS

पती,पत्नी व मुलाचा मृतदेह सापडला ,हत्या कि आत्महत्या संभ्रम कायम

Which team-will-play-against-Delhi-in-Women-Premier-League-2024-eliminator-match-today-RCB-and-Mumbai-in-the-final-round?



 पती,पत्नी व मुलाचा मृतदेह सापडला ,हत्या कि आत्महत्या संभ्रम कायम 

 वृत्तसंस्था नागपूर- जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशन हद्दीत राहात्या घरी नवरा, बायको व मुलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशन हद्दतील शांतीनगर, निमखेडा गावातील रहिवासी श्रीनिवास ईळुपुगंंटी (वय ५८), पत्नी श्रीपद्मलता ईळुपुगंंटी (वय ५४) तसेच मुलगा चंद्रशेखर श्रीनिवास ईळुपुगंंटी (वय २९) या तिघांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे.







गुरूवार १४ मार्च रोजी पहाटे ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली. मिळालेल्या माहिती नुसार श्रीनिवास ईळुपुगंटी हे व्यंकटेश राईस मीलचे मालक होते. घटनेच्या वेळी घरी श्रीनिवास ईळुपुगंटी यांचे सासु, सासरे खालच्या घरातील खोलीत झोपले होते. श्रीनिवास पत्नी सोबत वरच्या मजल्यावरील बेडरुममध्ये तर मुलगा चंद्रशेखर बाजुला असलेल्या बेडरुममध्ये झोपलेला होता. तर मुलगा चंद्रशेखर याची पत्नी खालच्या हॉलमध्ये झोपून होती. मुलगा चंद्रशेखर याला पहाटे घरी बाहेरुन दुध आणायची सवय होती. पती जागे का झाले नाही म्हणून ती बघायला गेली असता सर्व घटना ऊघडकीस आली. या तीघांचा खून झाला की त्यांनी आत्महत्या केली या मागचे नेमके कारण कळु शकलेले नाही. ठाणेदार निशांत फुलेकर यांची टिम तपास करीत आहे. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पण, ते माग काढु शकले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.