चुलत भाऊचा चार महिन्यांपासून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार
चुलत भाऊचा चार महिन्यांपासून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार
लेवाजगत न्यूज जळगाव-घरी कोणीही नसतांना गेल्या चार महिन्यांपासून काकाकडे राहणाऱ्या पुतण्याकडून आपल्या बहिणीवर अत्याचार करीत होता. ही बहिण भावाच्या नात्याला काळीमा फसणारी धक्कादायक घटना ११ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास त्यांच्यासोबत तिच्या काकांचा मुलगा देखील वास्तव्यास आहे. ही अल्पवयीन मुलगी इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे. मुलीचे कुटुंबिय घरी नसतांना मुलीचा चुलत भाऊ हा तिच्यावर अत्याचार करीत होता. गेल्या चार महिन्यांपासून तो मुलीवर अत्याचार करीत असल्याने मुलीला मारहाण देखील करीत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी समुपदेशकांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलिसात पोक्सोकायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर या करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत