Header Ads

Header ADS

अमळनेरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने वृध्दाचा होरपळून मृत्यू


 अमळनेरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने वृध्दाचा होरपळून मृत्यू

लेवाजगत न्युज अमळनेर:- अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी २४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत परिवारातील अन्य सदस्य मात्र सुदैवाने बचावले आहेत. दिलीप नामदेव पाटील (वय-६५) असे या घटनेत मृत झालेल्या इसमाचे नाव आहे.


याबाबत अधिक माहिती की, होळीच्या दिवशी रविवारी २४ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिलीप पाटील यांच्या घरात अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण घराला आग लागली. लाकडी छत व घरात कापूस साठवून ठेवला असल्याने आगीने लागलीच रौद्ररुप धारण केले. यामुळे संपूर्ण घराला आग लागली. दिलीप पाटील यांच्या पत्नी, मुलगा आणि नात लागलीच घराच्या बाहेर पळत आले.


मात्र आगीमुळे दिलीप पाटील यांना चक्कर आल्याने ते घरात पडले. संपूर्ण घराला आग लागल्याने दिलीप पाटील यांना बाहेर पडता आले नाही. यात त्यांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच नागरिकांनी आग विझविण्यासाठी मिळेल त्या साधनाचा वापर करुन प्रयत्न केले. मात्र आग आटोक्यात आली नाही. यानंतर अमळनेर अग्निशमन विभागाला आगीची माहिती देण्यात आली. अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोचत आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत संपूर्ण संसार उध्वस्त झाला होता. याप्रकरणी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.