Header Ads

Header ADS

संविधान दत्तकग्राम विशेष उपक्रम-सावदा येथील सम्राट फाउंडेशने वढोदा प्र.सावदा गाव घेतले दत्तक

 

constitution-adopted-village-special-activities-savada-here-emperor- foundations-vadhoda-pr-sawda-village-adopted

संविधान दत्तकग्राम विशेष उपक्रम-सावदा येथील सम्राट फाउंडेशने वढोदा प्र.सावदा गाव घेतले दत्तक

लेवाजगत न्यूज सावदा:-  'सम्राट फाउंडेशन सावदा' संचलित "सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल वढोदे प्र. सावदा" ता. यावल जि. जळगांव या शाळेने _आम्ही संविधानवादी_ या विशेष उपक्रमाअंतर्गत संविधान ग्राम म्हणून  यावल तालुक्यातील वढोदे प्र.सावदा  या गावाला दत्तक घेतले.

हा व्हिडीओ बघा-सावदा येथील सम्राट फाउंडेशनने संविधान दत्तक ग्राम विशेष उपक्रमासाठी वढोदा प्र.सावदा घेतले दत्तक

https://youtu.be/av94Q72HEa8

भारतीय संविधानाने आम्हाला काय काय दिले? याची माहिती एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक भारतीयाला असावी, लोकांना भारतीय संविधानाची महती कळावी, आपल्या हक्क आणि अधिकारांसोबतच मूलभूत कर्तव्यांची जाण व्हावी, जे संविधान कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व भारतीयांना समान न्याय प्रदान करते त्या भारतीय संविधानाच्या बाबतीत जनमानसात जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने  'सम्राट फाउंडेशन सावदा' संचलित "सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल वढोदे प्र. सावदा" ता. यावल जि. जळगांव या शाळेने आम्ही संविधानवादी_ या विशेष उपक्रमाअंतर्गत परिसरातील १० गावे दत्तक घेण्याचा मानस केला आहे. उपक्रमा अंतर्गत परिसरातील गावे दत्तक घेऊन त्या गावांमध्ये आठवड्यातून एक दिवस संविधान ग्राम कार्यशाळा राबवली जाईल. ज्याच्या माध्यमातून गावातील सर्वच नागरिकांना भारतीय संविधानाबाबत जागरुक केले जाईल. लहानांपासून तर वृद्धांपर्यंत संविधान कशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रदान करते, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक न्याय प्रदान करते, विचार अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देते, या सर्व प्रकारची जागरूकता आणि माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात येईल. 

हा व्हिडीओ बघा-अपघातांच्या शृंखलेत नंतर बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गवरील सावदा शहरातील दुभाजकाच्या  चारीचे काम सुरू 

https://youtu.be/xAMMuFP3Yhk

        लोकशाहीचा आदर , संविधानाचा जागर"या माध्यमातून आज दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी ह्या विशेष उपक्रमाची सुरुवात वढोदे प्र.सावदा या पहिल्या गावाला दत्तक ग्राम म्हणून करण्यात आली. यावेळी गावातून प्रभात फेरी काढून संविधानाच्या घोषणा देण्यात आला. कार्यक्रमांमध्ये विविध मान्यवरांनी सदर कार्यक्रमाला सदिच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाला गावचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच नंदकिशोर सोनवणे, उपसरपंच सुनील बोदडे, पोलिस पाटील विकास बोदडे, सम्राट फाउंडेशनचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे, सदस्या शमिभा पाटील, सदस्य ॲड. योगेश तायडे, चेअरमन अश्विनी मेढे, पत्रकार शामकांत पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षका ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, रिस्पेक्ट युथ फाउंडेशनचे सदस्य, परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.