Header Ads

Header ADS

रेल्वे रुळ ओलांडताना लोकलखाली आला, प्रवाशांनी अख्खा डबाच हालवून त्याला बाहेर काढलं, पण जीव मात्र गेला


  रेल्वे रुळ ओलांडताना लोकलखाली आला, प्रवाशांनी अख्खा डबाच हालवून त्याला बाहेर काढलं, पण जीव मात्र गेला

लेवाजगत न्युज वाशी :-वाशी रेल्वे स्टेशनवर रुळ ओालांडताना (Vashi Local Train Accident ) गाडीखाली आलेल्या प्रवाशाचा अखेर मृत्यू झाला आहे. प्लॅटफॉर्मवरील सर्व प्रवाशांनी त्यांना गाडीखालून काढलं होतं. पण जखमी झालेल्या प्रवाशाचा अखेर मृत्यू झाला. राजेंद्र खाडके (Rajendra Khadke Death) असं या मृत प्रवाशाचं नाव आहे. 

वाशी रेल्वे स्टेशनवर रेल्वे रूळ ओलांडताना राजेंद्र खाडके नावाचे प्रवासी गाडी खाली आले. खाडके हे काही काळ गाडीखाली अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी प्लॅटफॉर्मवरच्या आणि गाडीतल्या प्रवाशांनी एकत्र येत चक्क सर्वशक्तिनिशी गाडीचा डबा हलवला होता. प्रवाशांच्या या समूहशक्तीतून त्यांना डब्याखालून बाहेर काढण्यात यश आलं. मात्र राजेंद्र खाडके गंभीर जखमी झाले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.