Header Ads

Header ADS

ज्या मैत्रीत फक्त समर्पण असते तीच मैत्री खरी: प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे

The-friendship-in-which-only-surrender-is-the-friendship-is-true- Principal-Dr-RB-Waghulde


ज्या मैत्रीत फक्त समर्पण असते तीच मैत्री खरी: प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे

लेवाजगत न्यूज फैजपूर:-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थि विकास विभाग जळगाव व धनाजी नाना महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय मैत्री शिबीरच्या समारोप समारंभ प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ.आर.बी. वाघुळदे यांनी सांगितले की मैत्री भाव जोपासला जातो पण त्यात शुध्द आचरणाची आणि समर्पणाची भावना असली पाहिजे, समारोप समारंभ चे उद्घाटक म्हणून डॉ.पी.डी.पाटील सीनेट सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी ही मैत्री औषदांप्रमाणे असते तिचा योग्य वापर करावा अन्यथा साईड इफेक्ट होतात असे सांगितले, समारोप समारंभ चे  प्रसात्विक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.विजय सोनजे यांनी केले तसेच या प्रसंगी उत्कृष्ट शिबीरार्थी स्वयंसेवक म्हणून, गायत्री सुरवाडे, ईश्वर चौधरी, राजरत्न तायडे बोदवड, सलोनी भोई- मुक्ताईनगर, नेहा शिसोदिया जळगाव, यांना तर उत्कृष्ट विविध खेळांत विजयी विद्यार्थी राहुल धनगर-चोपडा व नेहा महाजन फैजपूर या विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला, तसेच शिबिरातील सर्व स्तरावर सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून अन्वर फकीर, या विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला.समारोप समारंभ चे सूत्र संचालन डॉ.शुभांगी पाटील व डॉ.डी.एल.सूर्यवंशी यांनी केले तर आभार डॉ.जयश्री पाटील यांनी मानले, तत्पूर्वी समारोप समारंभाच्या आधी तीसऱ्यादिवसाच्या व्याख्यान सत्राचे आयोजन केले होते त्यासाठी लाभलेले वक्ते डॉ.एस.व्ही.जाधव यांनी मैत्री स्वतःशी या विषयावर  मार्गदर्शन केले. दुसरे वक्ते प्रा. विलास सोळुंके यांनी मैत्री पर्यावरणाशी या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना सांगितले की पृथ्वीचे आपण मालक नाहीत म्हणून तिचा फक्त वापर करा तिच्यावर अधिकार गाजवू नका या पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत म्हणून पाहुण्यासारखे राहा, अश्या प्रकारे विविध विषयांवर मागील तीन दिवस अनेक मान्यवरांनी शिबिरार्थी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा.अचल भोगे, कॅप्टन राजेंद्र राजपूत, डॉ.ताराचंद सावसाकडे, प्रा.शिवाजी मगर, प्रा.प्राजक्ता काचकुटे,प्रा.चेतना नेहते, प्रा.सरला तडवी,प्रा.नाहीदा कुरेशी, प्रा.राकेश तळेले, प्रा.जी.एस मारतळे, प्रा.शेरसिंग पाडवी, प्रा. शुभांगी पाटील, श्री. शेखर महाजन, श्री प्रकाश भिरूड, श्री अमित गारसे, विद्यार्थिनी प्रतिनिधी रोहिणी माळी, विद्यार्थी प्रतिनिधी राहुल करवले, स्वयंसेवक म्हणून सागर ठाकूर, दिव्या वानखेडे, गायत्री सुरवाडे, ईश्वर चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.