Header Ads

Header ADS

छत्तीसगड येथे होणा-या राष्ट्रीय तायक्वांदो सब-ज्युनियर स्पर्धेसाठी रायगड चे सुभाष पाटील यांची स्पर्धा प्रमुख व गार्गी पाटील हीची खेळाडू म्हणून निवड

Subhash-Patil-of-Raigarh-is-selected-as-the-chief-of-competition-and-Gargi-Patil-as-players-for-national-taekwondo-sub-junior-competition-to-be-held-at-Chhattisgarh


 छत्तीसगड येथे होणा-या राष्ट्रीय तायक्वांदो सब-ज्युनियर स्पर्धेसाठी रायगड चे सुभाष पाटील यांची स्पर्धा प्रमुख व गार्गी पाटील हीची खेळाडू म्हणून निवड

लेवाजगत न्यूज उरण (सुनिल ठाकूर )तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) या अधीकृत संघटने मार्फत दिनांक १८ ते २० जानेवारी २०२४ रोजी बाळेवाडी पुणे येथे राज्यस्तरीय सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रायगड ची खेळाडू कुमारी गार्गी पाटील हीने आपल्या वेगवान उत्कृष्ट खेळाने प्रतीस्पर्धकांवर मात करून सुवर्ण पदक मिळवले. व दिनांक १ ते  ४ जानेवारी २०2४ रोजी बलबीर ज्युनेजा इंडोर स्टेडीयम, बुध्दापारा, बायपुर छत्तीसगड येथे होणा-या ३७ वी राष्ट्रीय सब-ज्युनियर क्युरेगी स्पर्धेत गार्गी पाटील ही महाराष्ट्र संघाचे प्रतीनिधीत्व करणार आहे.

तसेच रायगडचे सुपुत्र सुभाष पाटील तायक्वांदो आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक व ज्७ वी डीग्री ब्लॅक  बेल्ट यांची तायक्वांदो खेळात निस्वार्थीपणे पंच प्रशिक्षक म्हणुन देशात य परदेशात आतापर्यंत करत आलेल्या उल्लेखनीय कामगीरी ची दखल घेत व त्यांच्या अनुभवाचा फायदा खेळाडू, प्रशिक्षक व पंच यांना व्हावा व भविष्यात देशातुन उत्कृष्ट पंच प्रशिक्षक व खेळाडू तयार होतील म्हणून देशातील या खेळाची अधीकृत शिखर संघटना तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया च्या पढ़ाधिका-यांनी सुभाष पाटील यांची छत्तीसगड येथे होणा-या ३७ वी राष्ट्रीय क्युरेगी  व पुमसे राष्ट्रीय सब-ज्युनियर स्पर्धा प्रमुख पदी नेमणुक केली आहे.

सुभाष पाटील व गार्गी पाटील यांना वरील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल रायगड तायक्वांदो असोसिएसन, तायक्जांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) चे पदाधिकारी  प्रशिक्षक व खेळाडू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.